केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमध्ये तुषार क्रांती घडवून आणण्याचे अभिवचन दिले असून, महाराष्ट्र शासन ड्रोन शेतीच्या प्रचारासाठी विविध क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करेल. असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
ब्रेकिंग : अजून चार दिवस पाऊस !
वनामती व अॅग्रो व्हिजनमार्फत शेतीसाठी ड्रोनचे महत्व या विषयावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्याचे कृषीमंत्री सत्तार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमनी मिश्र, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, ऍग्रो व्हिजनचे सी. डी. माई, रवी बोरटकर, रमेश मानकर, डॉ. गोरंटीवार, श्रीधरराव ठाकरे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड्रोन शेती’संदर्भात राज्य शासन बँक सबसिडी, पायलट ट्रेनिंग, समूह शेती गटासाठी कर्ज व्यवस्था, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातून या स्टार्टअप उद्योगाला मान्यता देण्याचा मसुदा लवकरच तयार करेल. असे सांगून, कृषीमंत्री सत्तार म्हणाले, कृषी मंत्रालयाच्या या मसुद्याला राज्य शासनाची मान्यता घेऊन नवी दिल्ली येथे केंद्रीय विविध संघटनांसोबत चर्चेसाठी सादर करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
मोठी बातमी : लम्पी स्कीननंतर आता चायनीज व्हायरसची धास्ती ?
एक दिवस बळीराजासोबत सुरू असलेल्या अभियानाची माहिती देवून, कृषीमंत्री सत्तार म्हणाले, केंद्र शासनाप्रमाणे मुख्यमंत्री किसान योजना तयार करण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत किमान आर्थिक गरजा पुरवता यावी, यासाठी विविध योजना कृषी विभागा मार्फत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ड्रोन शेती तंत्रज्ञान हे अतिशय उत्तम तंत्रज्ञान असून या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात फायदेशीर शेती करणे आवश्यक आहे. फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा होते. ‘ड्रोन तंत्रज्ञान’मुळे यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्यामार्फत फवारणी तसेच पिकांना आवश्यक असणारे औषधी द्रव्य देण्याची गतिशील, फायदेशीर, नेमकी प्रक्रिया करणे सहज शक्य असल्याचे उदाहरणांसह सांगितले. जगामधल्या प्रगत ‘स्प्रिंकल टेक्नॉलॉजी’चा वापर यामध्ये करण्यात आला आहे. विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात आता समूह शेतीला पाठबळ मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये ड्रोन शेतीमुळे रोजगार निर्मिती असे ते म्हणाले.
हे नक्की वाचा :
देशात यंदा अन्नधान्याचे 3 हजार 157 लाख टन उत्पादन अपेक्षित : नरेंद्र सिंह तोमर
महाराष्ट्र शासनाने लघु मध्यम व सूक्ष्म रोजगार मंत्रालयामार्फत या प्रकल्पाला कर्ज उपलब्ध करून द्यावे. असे सांगून गडकरी म्हणाले, जेणेकरून साधारणतः आठ लाखापर्यंत किंमत असलेल्या या ड्रोनला सहज कर्ज उपलब्ध होईल व या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी यावेळी ऊसासाठी हार्वेस्टरची योजना तयार करण्यात यावी, अशी सूचना केली.
मोठी घोषणा : सहकारी सोसायट्या मार्फत मध्यम व दीर्घ पतपुरवठ्याचा धोरणात्मक विचार : अमित शहा
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1