सध्या राज्यासह देशात लम्पी स्कीन रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे अनेक पशुपालक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे झाले आहे. लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींनी या आजाराची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रातील राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
महत्त्वाची बातमी : ड्रोन शेती प्रचाराची कृषीमंत्र्यांनीच दिली गडकरींना ग्वाही !
या लम्पी स्कीन आजारामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत. असे असताना आता जनावरांमधील लम्पी स्कीन या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारतामधील शास्त्रज्ञांनी लम्पी रोगावर लस तयार केली आहे. या लसीकरणाबरोबरच तपासणी चाचण्यांना वेग देऊन जनावरांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन हा आजार अटोक्यात आणला जाईल.
गेल्या काही दिवसांपासून जनावरांना त्वचेचा आजार होत आहे. राजस्थानमध्ये जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात असून 2025 पर्यंत देशातील प्रत्येक जनावराला तोंडाच्या आणि पायाच्या आजारावर लस दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
ब्रेकिंग : अजून चार दिवस पाऊस !
शेती उत्पदनात कमी-अधिक झाले तरी याच पशुपालन या जोड व्यवसायावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. नोएडामध्ये वर्ल्ड डेअरी सिमिट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन केले जात आहे. जगभरातील 156 तज्ञ हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.
दूध उत्पादन वाढीसाठी ही परिषद महत्वाची राहणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अत्याधुनिक पद्धतीबाबतही माहिती होऊ शकते. दरम्यान, आतापर्यंत लाखोंहून अधिक जनावरांना या विषाणूची लागण झाली आहे. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या देशात त्वचारोगाची पहिली प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर काही महिन्यांतच त्वचेचा रोग देशाच्या 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे.
मोठी बातमी : लम्पी स्कीननंतर आता चायनीज व्हायरसची धास्ती ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1