हिरवे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनात मोलाची भूमिका निभावणाऱ्या बांबूचे महत्त्व वरचेवर वाढत आहे. जमिनीची धूप थांबविणे व जमिनीची कस वाढविण्यासाठी देखील बांबूचा उपयोग होतो. याच बाबुपासून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आता महाराष्ट्र बांबू प्रोमोशन फौंडेशन आणि बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने बुलढाणा जिल्ह्यात लवकरच बांबू उद्योग विकासाचे एक नवीन पर्व सुरू करण्यात येणार आहे.
मोठी घोषणा : लम्पी स्कीन रोगावर स्वदेशी लस विकसीत : पंतप्रधानांची घोषणा
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी बांबू हा एक महत्वाचा घटक ठरू शकतो असे एका अभ्यासात आढळून आले असून, शेतकऱ्यांच्या जीवनात बांबूच्या उत्पन्नातून बदल घडवून आणता येणे शक्य आहे अशी शाश्वती झाल्यानंतर या कायद्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यासंबंधी राष्ट्रपतींनी भारतीय वन कायदा 1927 कलम 2 (7) मध्ये सुधारणा करण्यासाठी 2017 साठी अध्यादेश काढला होता व त्यानुसार बांबू हे आता झाड नाहीतर गवतवर्गीय वनस्पती आहे अशी मान्यता देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र बांबू प्रोमोशन फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. गिरीराज यांनी बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयाला भेट दिली व संस्थापक अध्यक्ष असलेले राधेश्याम चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. या चर्चेदरम्यान दोघांनी विदर्भ आणि मराठवाड्यात बांबू उद्योगाचा विकास करण्यासाठी काय करता येईल व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू शेती करण्यासाठी काय करावे ? यासाठी कोणते रोपांचा वापर करावा? या सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा केली.
महत्त्वाची बातमी : ड्रोन शेती प्रचाराची कृषीमंत्र्यांनीच दिली गडकरींना ग्वाही !
एवढेच नाही तर पाश्चिमात्य देशांमध्ये बांबू हे प्लास्टिकला कसे पर्याय ठरू शकते व त्या देशांमध्ये बांबूच्या लागवड क्षेत्रात किती वाढ झाली आहे याबाबत काही लघुचित्रफीत देखील दाखवण्यात आल्या. एवढेच नाही तर बुलढाणा जिल्ह्यात बांबु पासून वस्तू तयार करणारा जो काही बुरुड समाज आहे व सुतार काम करणाऱ्या वर्गाला सोबत घेऊन बांबूपासून ज्या काही वस्तू तयार करण्यात येतात.
अशा वस्तू तयार करण्याचे चार महिन्यांचे प्रशिक्षण चंद्रपूर किंवा त्रिपुरा येथे देण्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली. यासाठी बुलढाणा अर्बन व बांबू प्रोमोशन फौंडेशन बुलढाणा जिल्ह्यात बांबू उद्योग उभे राहावे, यासाठी व शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी संयुक्तपणे काम करणार आहेत. तसेच शेतकर्यांसाठी एक कार्यशाळा देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.
मोठी बातमी : लम्पी स्कीननंतर आता चायनीज व्हायरसची धास्ती ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1