सर्व धरणे शेतकऱ्यांच्या जमिनीवर आह्र्त. धरणांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामधून निर्माण होणाऱ्या विजेवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. मात्र विजेचे वाटप होताना शिल्लक राहिलेली वीज रात्री बारा वाजता शेतकऱ्यांच्या माथी मारली जाते व शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
मोठी बातमी : गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या या जिल्ह्याला 98 कोटी 58 लाखांची मदत
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिरपूर जैन (जि. वाशीम) येथे झालेल्या मेळाव्यात शेट्टी बोलत होते. या वेळी हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याचे सांगून, शेट्टी म्हणाले, शेतीसाठी रात्रीची वीज मिळते रात्री विजेचा शॉक लागून व साप चावून पंधराशे शेतकऱ्यांचा राज्यात मृत्यू झाला आहे. त्याचे पाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
मोठा संकल्प : आता अभ्यासक्रमात 5 वी पासून शेती विषय : कृषीमंत्र्याचा संकल्प
विजेच्या वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. यावर न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहोत. शासन दरबारी आकांक्षित जिल्हा म्हणून वाशीमची नोंद आहे. या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही आकांक्षित झाले आहेत काय ? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अतिवृष्टीनंतर शासनाच्या अहवालामध्ये वाशीम जिल्ह्यामध्ये एक गुंठाही जमीन खरडून गेली नसल्याचे नमूद आहे. महसूल खात्याने घरात बसून सर्व्हे केला आहे. नवीन सरकार येऊन अडीच महिने झाले तरीही पालकमंत्री नेमलेले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांना जाब कुणी विचारावा, असा प्रश्न आहे.
गेल्या चार वर्षांपासून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत तर शेतकरी कंगाल झाला आहे. हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकत घेता येणार नाही असा कायदा करण्यासाठी सहा ते आठ ऑक्टोबरला दिल्ली येथे अधिवेशन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाची बातमी : कांद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केली केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे ही विनंती
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1