कांद्याला मिळणारा अत्यल्प दर बघता कांदा उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत सापडला आहे. शेतकरी सुखी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असून, शेतकऱ्यांना नष्ट करण्याचे धोरण राबवीत आहे, अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
घणाघाती टीका : विजेच्या वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय : राजू शेट्टी
ओतूर (ता. जुन्नर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि जुन्नर तालुका शेतकरी संघटना यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ट्रॅक्टरवर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आयोजित सभेत मुंडे बोलत होते.
शेतकरी एकजूट व आंदोलनामुळे शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारला मागे घ्यावे लागल्याचे सांगून मुंडे म्हणाले, शेवटी नरेंद्र मोदी यांनाही शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले, एवढी ताकद शेतकरी एकजुटीत आहे. त्यामुळे शेतकरी सुखी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मोठी बातमी : गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या या जिल्ह्याला 98 कोटी 58 लाखांची मदत
या वेळी बोलताना आमदार अतुल बेनके म्हणाले, ‘‘कांदा दरवाढीबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतली. त्यांनी राज्य सरकारने याबाबत कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे सांगितले. निर्यातीवरील कर कमी करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची गरज असल्याचे ते यावेळी म्हणाले. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार व धनंजय मुंडे यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात असा प्रस्ताव दिल्याने मागील वर्षी कांदा निर्यातीवरील कर कमी केला होता. परंतु, नवीन सरकारचे मंत्री जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्कार समारंभात रमले आहेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विमा योजना सुरू करून शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षीत करावे, अशी मागणी केली असता बाजार समितीचे माजी सभापती ॲड. संजय काळे यांनी आगामी काळात ती राबवण्याचे मान्य केले.
मोठा संकल्प : आता अभ्यासक्रमात 5 वी पासून शेती विषय : कृषीमंत्र्याचा संकल्प
या आंदोलनावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी स्वीकारले. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे व सहायक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. जयप्रकाश डुंबरे यांनी सूत्रसंचलन केले. पांडुरंग पवार यांनी आभार मानले.
या वेळी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे माजी सभापती ॲड. संजय काळे, शेतकरी नेते तान्हाजी बेनके, अंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, संजय भुजबळ, प्रमोद खांडगे, जुन्नर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, अंकुश आमले, मोहित ढमाले, बबन तांबे आदी उपस्थित होते.
महत्त्वाची बातमी : कांद्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केली केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे ही विनंती
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1