लम्पी स्कीन आजाराने देशात धुमाकूळ घातला असून, देशभरात या आजारामुळे सुमारे 57 हजार गायींचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक 36 हजार मृत्यू राजस्थानमध्ये झाले आहेत. दरम्यान, या आजाराला महामारी घोषित करण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हे वाचा : भाजप सरकार हे शेतकरी विरोधी : धनंजय मुंडे
सध्या देशात लम्पी स्कीन रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे अनेक पशुपालक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे झाले आहे. लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव 15 राज्यांतील 175 जिल्ह्यांमध्ये झाला आहे. 15 लाखांहून अधिक गायींनी या आजाराची लागण झाली आहे.
देशातील गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आता हिमाचल प्रदेशातही लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आंध्र प्रदेशातही काही प्रकरणे समोर आली आहेत. या आजाराचा सर्वाधिक फटका राजस्थानला बसला आहे.
घणाघाती टीका : विजेच्या वाटपात शेतकऱ्यांवर अन्याय : राजू शेट्टी
मध्य प्रदेशातील 11 जिल्ह्यांत आतापर्यंत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 542 जनावरे प्रादुर्भावग्रस्त आढळली आहेत. लम्पी स्कीन आजाराने ग्रस्त जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग सक्रिय झाला आहे. लसीकरणालाही वेग आला आहे. गेल्या 20 दिवसांत लम्पी स्कीन आजाराचा प्रभाव अधिक वाढला आहे. तर महाराष्ट्रातील राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.
हिमाचल प्रदेशातही आता लम्पी स्कीन आजार पसरला आहे. या राज्यात 2,309 गायींचा मृत्यू झाला आहे. तर 55 हजार 700 गायींना प्रादुर्भाव झाला आहे. हिमाचल प्रदेशातील 12 पैकी नऊ जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव नोंदवला गेला आहे. या आजाराला महामारी घोषित करण्याची मागणी येथील पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे.
मोठी बातमी : गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या या जिल्ह्याला 98 कोटी 58 लाखांची मदत
दरम्यान, केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला गायींना लस देण्याचे आवाहन केले असून, राज्य सरकारांना लसीकरण त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मोठा संकल्प : आता अभ्यासक्रमात 5 वी पासून शेती विषय : कृषीमंत्र्याचा संकल्प
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1