महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या गुरुवारी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी या मागण्या मान्य न केल्यास कोयता बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेतर्फे डॉ. सुभाष जाधव यांनी दिला.
ब्रेकिंग : यंदाचा ऊस गाळप हंगाम या तारखेपासून सुरु !
गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे ऊसतोड कामगार, गाडीवान, मुकादम व वाहतूकदार यांची नोंद करावी, यंदाच्या हंगामात महामंडळाचे ओळखपत्र मिळावे, कामगारांना पाच लाख रुपयांचा अपघाती विमा व वैद्यकीय खर्च देण्याची योजना मिळावी व मुला-मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यावी, या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : परतीच्या मान्सूनचा प्रवास लांबला
ऊसतोडणी कामगार, गाडीवान, मुकादम, ऊस वाहतूक मालक वाहतूकदार यांच्या अनेक वर्षे मागण्या प्रलंबित आहेत. यंदाचा गळीत हंगाम दीड महिन्यात सुरू होईल. अद्याप ऊसतोडीसह इतर कामगारांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. वारंवार मागणी करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. यासाठी हा मोर्चा काढला जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातून हजार, तर राज्यातून पाच हजार ऊसतोडणी व वाहतूक कामगार सहभागी होतील, असे डॉ. सुभाष जाधव यांनी सांगितले आहे.
मोठी बातमी : लम्पी स्कीन आजाराचा ने देशात धुमाकूळ : 57 हजार गायींचा मृत्यू
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1