अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी विद्यापीठाचे 22 वे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला आहे.
ब्रेकिंग : यंदाचा ऊस गाळप हंगाम या तारखेपासून सुरु !
डॉ. गडाख महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्य करत असून, त्यांची कृषि विद्यापीठात 38 वर्ष सेवा झाली आहे. या सेवेकाळात त्यांनी विविध पदावंर काम केलेले आहे. त्याच्या कार्यकाळात विद्यापीठाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरु झाली. त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठात राबविले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात दैदिप्यमान कार्य केलेले आहे. त्यांनी विविध पिकांचे 19 वाण विकसित केलेले आहेत. यामध्ये वांग्याचा एक, कारल्याचे पाच, काकडीचे दोन, वालचे एक, ज्वारीचे नऊ आणि नागलीचा एक वाण विकसित केलेले आहे.
ब्रेकिंग न्यूज : परतीच्या मान्सूनचा प्रवास लांबला
डॉ. गडाख यांचे आत्तापर्यंत 80 संशोधन लेख, 43 तांत्रिक लेख, 144 विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिध्द झालेली आहेत. त्यांनी विकसीत केलेल्या ज्वारीच्या पंचसुत्री व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे शेतकर्यांना कोरडवाहू ज्वारीचे शाश्वत उत्पन्न मिळू लागले आहे. त्यांच्या शिक्षण, संशोधन आणि कृषि विस्तारातील अभुतपूर्व योगदानामुळे त्यांना जागतिक स्थरावरील एक पुरस्कार, राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार आणि राज्य पातळीवरील सहा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मोठी बातमी : लम्पी स्कीन आजाराचा ने देशात धुमाकूळ : 57 हजार गायींचा मृत्यू
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1