हिंगोली जिल्ह्यात उभारले जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष म्हणून शिंदे गटात सामील झालेले हिंगोली लोकसभेचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांची वर्णी लागली आहे. गेल्या अनेक दिवसापासून हेमंत पाटील हे हळद संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा करत होते पाठपुरावा करत होते; त्यामुळे केंद्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मोठी बातमी : यंदा खरिपात 149.92 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणार जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. या हळदीवर योग्य संशोधन केले जात नव्हते. हिंगोलीच्या हळदीला जागतिक बाजारपेठेमध्ये ओळख निर्माण व्हावी, हळदीचे संशोधन व्हावे, यासाठी गेल्या अनेक दिवसापासून कृषी तज्ज्ञांसोबत हेमंत पाटील वारंवार भेटी घेऊन संशोधन केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करत होते.
अखेर महाविकास आघाडी सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संशोधन केंद्राला मंजुरी देवून, केंद्राला 100 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्यानंतर शिंदे सरकार स्थापन होताच या संशोधन केंद्रासंदर्भात 14 सप्टेंबला हा शासानिर्णय काढून, चालू आर्थिक वर्षांमध्ये दहा कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला.
महत्त्वाची बातमी : धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता
भारतीय हळदीला जगभरातून मागणी वाढत आहे. गेल्या तीन वर्षापासून हळद निर्यातीत भारताचे आकडे वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोना काळात बाजारपेठा बंद असतानाही देशातून हळदीची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. गेल्या वर्षी देशातून 1 लाख 83 हजार 868 टन हळदीची निर्यात झाली होती. यंदा देशातून हळदीची विक्रमी 2 लाख टन निर्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. शरद गडाख
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1