परतीच्या संततधार पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, परतीच्या पावसाने द्राक्ष, कापूस, सोयाबीन, ऊस, भाजीपाला, भुईमूग, उडीद या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. फळछाटणी झालेल्या द्राक्ष बागावर दावण्या या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, काढणीला आलेल्या भाजीपालासह इतर खरीप पिके पाणी साचल्याने हातची गेली आहेत. दरम्यान, 15 ऑक्टोबरपासून राज्यात परतीचा पाऊस उघडीप देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून राज्यात विविध भागात आंधळी नक्षत्राच्या नावाप्रमाणे पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता अपेक्षित असताना पहाटेपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. दिवसभर ढगाळ हवामान राहिल्याने पिकांनाही नुकसानकारक ठरत आहे. परतीच्या या पावसामुळे अनेकांचे हाल केले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पाऊस कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस थांबल्यानंतरच शेतकऱ्यांना शेतातील कामे करता येणार आहेत.
महत्त्वाच्या टिप्स : जनावरांमधील घातक लम्पी स्कीन रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
सध्या वातावरण जरी ढगाळ असेल तर राज्यात उघडीप जाणवेल असेही सांगितले जात आहे. तसेच 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान किरोकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळी सणादरम्यान साधारण 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे.

रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे. मात्र, उद्यापासून राज्यात मान्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाची उघडीप होणार आहे. दरम्यान, पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. तसेच या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
महत्त्वाची गोष्ट : पावसाळ्यात जनावरांची अशी घ्या काळजी
परतीच्या या पावसाने कापूस आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्हीही पिकांचे परतीच्या पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. वेचणीला आलेल्या कापसाची काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र आहे. संपूर्ण कापूस पाण्यामुळे भिजल्याने कापसाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

काही द्राक्ष बागांच्या छाटण्या पूर्ण झाल्या असून या बागेतील द्राक्ष घड पोंगा अवस्थेत आहे, तर काही बागामध्ये कळी अवस्थेत आहेत. सततच्या पावसाने दावण्या या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. बागेच्या एखाद्या कोपऱ्यातील पानावर दिसणारा दावण्या रोग 24 तासांत सर्व बागेत पसरू शकतो, तर ४८ तासांत कोवळय़ा घडावर आक्रमण होऊन संपूर्ण पीक नष्ट होऊ शकते. या रोगाला आळा घालण्यासाठी महागडी औषधे फवारली, तरी पावसाने उपयोग शून्य ठरत असल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे.
ब्रेकिंग : राज्यात लवकरच विषमुक्त शेती धोरण ठरणार : कृषीमंत्री

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1