देशात सर्वत्र खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच रब्बीच्या पेरण्या सुरु होतील. दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असताना आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने रब्बीच्या सहा पिकांची किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. आज झालेल्या केंद्राच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज :
चिंताजनक : डिसेंबरपर्यंत पाऊस ?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 2022-23 साठी या रब्बी पिकांसाठी आधारभूत किमती निश्चित केला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिली असून, केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे आधारभूत किमती जाहीर केले आहे, त्यानुसार आता गव्हाची एमएसपी 2015 रुपयांवरुन 2125 क्विंटल म्हणजे 110 रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी 1635 वरुन 1735 म्हणजे 105 रुपयांनी वाढवण्यास आली आहे.

गहू, हरभऱ्याप्रमाणेच इतर महत्वाच्या रब्बीच्या सहा पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मसूरचा एमएसपी सर्वाधिक 500 रुपये वाढून 6 हजार रुपये क्विंटल झाली आहे. तर मोहरीचा एमएसपी 400 रुपयांनी वाढवला आहे. करडईचा एमएसपी 5 हजार 441 होता. तो 209 रुपयांनी वाढून 5 हजार 650 रुपये क्विंटल करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
महत्त्वाची माहिती : गोमुत्राचे हे आहेत ४४ फायदे
जून महिन्यात केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी धानाचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला होता. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरेतर, तेव्हाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 खरीप पिकांच्या 17 वाणांच्या नवीन एमएसपीला मंजुरी देण्यात आली होती.

तिळाच्या एमएसपीमध्ये 523 रुपयांनी, तूर आणि उडीद डाळीच्या एमएसपीमध्ये 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. धानाचा एमएसपी (सर्वसाधारण) 1,940 रुपये प्रति क्विंटलवरून 2,040 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.
मोठी बातमी : यंदा दिवाळीत गुलाबी थंडीबरोबर पाऊसही !
एमएसपी (MSP) म्हणजे किमान हमी भाव किंवा किमान आधारभूत किंमत. या किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून त्यांच्या पिकांची खरेदी करते. एकदा का एखाद्या पिकाला किमान हमी भाव जाहीर केला तर त्या किमतीखाली त्या पिकाची खरेदी करता येत नाही. किमान तेवढ्या किमतीला संबंधित पीक खरेदी करणे सरकारला बंधनकारक असते. किमान हमीभावामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचे आश्वासन मिळते. दिलासा मिळतो.

खरीप आणि रबी पिकाचा एमएसपी वर्षातून दोनदा ठरवल्या जातात. कृषी खर्च आणि किमती आयोग म्हणजे सीएसीपी या संबंधित केंद्र सरकारकडे शिफारस करते. त्या आधारे दरवर्षी तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया आणि आणि इतर पिकांचा एमएसपी घोषित केला जातो. या शिफारशी लक्षात घेऊन सरकार एमएसपी जाहीर करते. CACP कडून सध्या 23 पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो. त्यामध्ये 7 अन्नधान्य पिके, 5 डाळी, 7 तेल बिया आणि 4 व्यावसायिक पिकांसाठी सध्या एमएसपी जाहीर केला जातो.
मोठी बातमी : सिल्लोडमध्ये कृषी औद्योगिक पार्क उभारणार : उद्योगमंत्री सामंत

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1