राज्यात यंदा परतीच्या पावसामुळे राज्यात धुमाकूळ घातला असून, खरीप पिकांच्या काढणीवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या आलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असून, परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये पीकविमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे.
महा ब्रेकिंग न्यूज : रविवारी परतीच्या पावसाचा बायबाय ?
यंदा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तर परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 91 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळं सोयाबीन, कापुस, फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पीक विमा, नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत होते. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्यासह नुकसान भरपाईच्या मागणीसाठी परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा म्हणून परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक 73 हजार शेतकऱ्यांना 40.71 कोटींची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांकडून रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसांत सर्व संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे लोखंडे यांनी सांगितले.
मोठी बातमी : परतीच्या पावसाने द्राक्षबागा धोक्यात
खरीप हंगाम 2022 ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.

पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला 9 सप्टेंबर रोजी दिले होते.
हे नक्की वाचा : सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही : कृषीमंत्री सत्तार
त्यानुसार परभणी जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील 8 मंडळापैकी सिंगणापूर मंडळातील 8068 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6363.13 याप्रमाणे 4.80 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. जांब मंडळातील 10953 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6392.44 याप्रमाणे 6.40 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. झरी मंडळातील 10537 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6193.44 याप्रमाणे 6.01 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. दूधगाव मंडळातील 9184 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6421.83 याप्रमाणे 5.16 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. रामपुरी मंडळातील 6063 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6248.09 याप्रमाणे 3.99 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. सोनपेठ मंडळातील 6605 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6763.85 याप्रमाणे 4.16 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. माखणी मंडळातील 13626 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6697.18 याप्रमाणे 5.86 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. तर चुडावा मंडळातील 8778 लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 7018.60 याप्रमाणे 4.31 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. या आठ मंडळातील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व 73 हजार 814 शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमाभरपाई महसूल मंडळनिहाय मंजूर करण्यात आली.
मोठी बातमी : गोकुळच्या दूध खरेदी दरात उद्यापासून वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1