गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात रोजाना चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल सोयाबीनच्या बाजारभावात पाचशे रुपयांची वाढ झाली होती. मात्र आज सोयाबीनच्या बाजारभावात पाचशे रुपयांची घसरण झाली असून, सोयाबीन पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. असे असले तरी जागतिक बाजारपेठेत पामतेलाच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीन बाजार भावात देखील नक्कीच सुधारणा होईल, असे संकेत जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.
ब्रेकिंग न्यूज : जनशक्ती शेतकरी संघटनेचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन
सोयाबीनच्या बाजारभावात कमालीची चढ-उतार होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. दरम्यान यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात असताना आलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचा दर्जा खालावला आहे. शिवाय आता काढणी होत असलेला सोयाबीनमध्ये अधिक आद्रता असल्याने अशा सोयाबीनला बाजारात कमी बाजार भाव मिळत आहे.

दरम्यान पावसामध्ये सापडलेला सोयाबीन अधिक काळ साठवून ठेवता येणे शक्य नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव सोयाबीनची काढणी झाल्यानंतर लगेचच सोयाबीन विक्री करत असल्याचे चित्र आहे. शेतकरी बांधव सध्या खेडा खरेदीमध्ये सोयाबीन विकत आहेत. यामुळे बाजारापेक्षा सोयाबीनला कमी दर मिळत आहे.
मोठी बातमी : आमदार कैलास पाटील उपोषणाला वाढता पाठिंबा : शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक
पामतेलाच्या किमतीत वरचेवर वाढ होत असल्याने आज सोयाबीनच्या बाजारभावात 50 ते 100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी अजूनही जागतिक बाजारपेठेत सोयाबीनला पाहिजे तसा उठाव पाहायला मिळत नाही. यामुळे जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात अजूनही दबाव पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत पामतेलाचे दर कमी जास्त होत आहेत. अशा परिस्थितीत सोया तेलाचे तसेच सोयाबीनचे बाजार भाव देखील कमी जास्त होत आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीनच्या दरात थोडीफार सुधारणा झाली असून सोयाबीनचे बाजारभावाने 14 डॉलरच्या पातळीवर पोहोचला होता. जर आपण सोयाबीन वायद्यांचा विचार केला तर डिसेंबर सोयाबीनचे वायदे काल 1400 सेंन्ट प्रतिबुशेल्स वर बंद झाले. जर आपण दोन महिन्याच्या कालावधीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनची किंमत 13 ते 14 डॉलर प्रतिबुशेल इतकी आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा एकंदरीत विचार केला तर सोयाबीन व सोयाबीन पेंडीच्या दरात सुधारणा झाल्यामुळे भारतीय बाजारात देखील याचा आधार मिळू शकतो.
ब्रेकिंग : ऊस दर संघर्ष समितीच्या आंदोलनाला पंढरपुरात हिंसक वळण
या सगळ्या कारणांमुळे सध्या किमान बाजारभावात वाढ झाली असून एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये भाव मिळत आहे. जर आपण सध्याच्या सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याचे स्थिती पाहिली तर येणाऱ्या काही दिवसात सोयाबीनचा बाजार भाव 5500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

देशात सध्या सोयाबीनला 5 हजार 400 ते 6 हजार रुपये दर मिळतोय. सोयाबीनचा हा दर टिकून राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच नव्या हंगामात सोयाबीनला किमान 5 हजार 500 ते 6 हजार रुपये दर मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही दरपातळी लक्षात घेऊन सोयाबीन विक्री करावी, असे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे.
मोठी बातमी : गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागू : कृषीमंत्री सत्तार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1