गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का ? असा प्रश्न केला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या विधानामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
फायद्याची बातमी : सोयाबीन बाजार भाव सुधारण्याचे संकेत !
दरम्यान, विरोधकांनीही या प्रकरणी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर बुधवार पर्यंत माझ्या राजीनाम्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असे मोठे विधान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्याला मदतीचा हात द्यावा, अशी माफक अपेक्षा आहे. सरकारकडूनही नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे सुरु झाले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टीची पाहणी करायला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारूच्या गप्पा मारताना दिसत असल्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. त्यामध्ये ते जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का ? याची विचारणा करताना दिसत आहेत. या विधानामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
ब्रेकिंग न्यूज : जनशक्ती शेतकरी संघटनेचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन
अतिृष्टीची पाहणी करायला आलेल्या कृषीमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना विचारले की तुम्ही दारु घेता का? जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर देत कधी कधी थोडी घेतो. यामुळे मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दुःखाचा विसर पडतोय का ? असा प्रश्न निर्माण झालाय. अतिवृष्टीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या कृषीमंत्र्यांविरोधात बीडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. सत्तार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी तुमच्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते. सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण गदा घेऊन येते आणि त्याचा मुकाबला आमची ढाल तलवार कशी करते हे तुम्हाला दिसेल.

चंद्रकांत खैरे यांनी माझ्या विरोधात येऊन लढावे. त्यांच्यासाठी सिल्लोडचं मैदान खाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी हातात घेतलेल्या गदेसाठी हनुमानाची ताकद लागते. ती ताकद खैरे यांच्याकडे नाही ; ते माझ्याशी काय लढणार ? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.
मोठी बातमी : आमदार कैलास पाटील उपोषणाला वाढता पाठिंबा : शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1