फलोत्पादनातील मूल्य साखळीचा विकास हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. आजही फलोत्पादन क्षेत्रात 35 टक्के नासाडी होते, ती रोखण्याच्यादृष्टीने उपाययोजनांची गरज असून, राज्याचे स्वतंत्र कृषि निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पाहिले राज्य आहे. असे प्रतिपादन राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केले.
महत्त्वाची बातमी : सुशिक्षित युवकांनी नव्या तंत्राचा वापर करून शेती करावी : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत ‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते काल पुण्यात झाले त्याप्रसंगी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे बोलत होते.

या राष्ट्रीय परिषदेला राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.
फायद्याची बातमी : एक रुपयात पीकविम्याचे कवच असा प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांना देणार !
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना व सुधारित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्हीमुळे फलोत्पादनाचा आलेख चढता राहिला असल्याचे सांगून, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळपिकांची पडीक जमीन, बांधावर आणि मुख्य शेतात लागवडीसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेमध्ये पीक वैविध्यता साध्य करण्यासाठी 2022 पासून केळी, ड्रॅगनफ्रुट, अव्हॅकॅडो व द्राक्षे या नवीन फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी या योजनेतून 60 हजार हेक्टर लागवडीचे नियोजन केले असून आजअखेर 20 हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 4 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली असल्याचे सांगून भुमरे म्हणाले, मागील वर्षी 2 लक्ष हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यात आले आहे. फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदानाद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. अनेक भाजीपाला आणि फळ उत्पादनातही प्रथम क्रमांकावर आहे. शासनाच्या पुढाकारातून 22 पिकांना भौगोलिक मानांकनाचा दर्जा देण्यात आला आहेत. फुलांच्या उत्पादन क्षेत्रातही राज्यातील अनेक शेतकरी पुढे आहेत, अशीही माहिती फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी या परिषदेत दिली.
मोठी बातमी : पंचनाम्यासाठी पैसे मागणाऱ्या त्या कृषी सहायकाचे निलंबन

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1