शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन उद्धव ठाकरे 26 नोव्हेंबरला चिखली (जि. बुलढाणा) येथे भव्य शेतकरी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे शिंदे- फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांना सुरुवात केली आहे.
मोठी बातमी : यंदा द्राक्ष उत्पादकांना फटका : दिड महिना उशीराने द्राक्ष बाजारात येणार !
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी परतीच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. विधानसभा अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरेंचा होणारा हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत मातोश्री निवासस्थानी बैठकांचे सत्र पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. तसेच आगामी काळातील मित्र पक्षांसोबतच्या युतीबाबत या बैठकांनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

23 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली. तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली होती. तर याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतःरस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
महत्त्वाची बातमी : बुलडाण्यात सोमवारी ‘एल्गार मोर्चा’ : रविकांत तुपकर
सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कारण सुरुवातीला जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने हजेरी लावली होती. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेतले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत असताना ठाकरे यांचा चिखली येथील शेतकरी मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.

आनंदाची बातमी : रोपवाटिका योजनेच्या अनुदानात 48 हजाराची वाढ

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1