सध्या थंडीमधील गारठा वाढत असताना हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे सर्वसामन्यांबरोबरच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषत: राज्यात द्राक्ष बागांच्या ऑक्टोंबर छाटण्या सुरू असताना हा अंदाज वर्तविण्यात आल्याने द्राक्ष बागायतदारांच्या मनाची घडकी भरली आहे.
ब्रेकिंग न्यूज : आता पोल्ट्रीसाठी लागणार विशेष परवानगी !
राज्यात गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच हवामान विभागाने येत्या 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासात कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. उद्यापासून हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे आता पुन्हा नुकसान होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. राज्यात दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे.
मोठी बातमी : ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना पुन्हा एकदा सुरु
तसेच रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे याबाबत शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असाही सल्ला देण्यात आला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फायद्याची बातमी : पशुपालकांच्या खात्यावर लम्पी चर्मरोगाची 10 कोटींची नुकसान भरपाई जमा

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1