सध्य तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा काळ आहे. या रोगांमुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. उत्पन्न व उत्पादकता जर वाढवायची असेल तर तुरीवर येणाऱ्या रोगांवर प्रभावी उपाययोजना करून त्याचे नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसा विचर करता सध्याची वेळ योग्य आहे.
महत्त्वाची माहिती : बक्कळ उत्पादनासाठी, हे वापरा तूर लागवडीचे सुधारित तंत्र
तुरीवर प्रामुख्याने मावा हा रोग मोठ्या प्रमाणात येण्याचा धोका असतो. त्यानंतर तुरीवर मररोग, खोडावरील करपा, मुळकूज, खोडकूज हे बुरशीजन्य रोगही येतात. त्याचे वेळीच नियंत्रण केल्यास तुरीच्या उत्पादनात चांगला फरक पडतो. त्यामुळे तुर पिकाच्या व्यवस्थापनात रोगाचे नियंत्रण ही महत्त्वाची बाब आहे.
मावा किडींची पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूस राहून अथवा कोवळ्या शेंड्यावर, फुलांवर देठावर आणि शेंगांवर राहून त्यातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात व त्याच्या वाढीवर परिणाम होतो. प्रादुर्भाव जर जास्तच वाढला तर शेंगांचा आकार बदलतो. ही कीड चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्याच्या नियंत्रणासाठीया किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच बुप्रोफेझिन 25 टक्के प्रवाही 20 मि. ली किंवा मिथिल डिमेटॉन 20 टक्के प्रवाही 10 मि. ली. किंवा इंमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 3 मि.ली. प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने गरज पडल्यास करावी.
फायद्याची गोष्ट : हरभरा लागवड केलीय ? मग; असे करा व्यवस्थापन
मर या रोपावस्थेत रोगाची लक्षणे आढळल्यास ट्रायकोडर्माची एकरी 1 किलो भुकटी 20 – 25 किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे द्यावी. खोडावरील करप्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शेतातील रोगट फांद्या व झाडे जाळून नष्ट करावीत. लेबल क्लेम शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
हे करावेत प्रतिबंधक उपाय :
1. शेतातील रोगट फांद्या, धसकटे इत्यादी वेचून त्यांचा नायनाट करावा म्हणजे रोगाचा प्रसार टाळता येईल.
2. खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी शेतात पाणी साचलेले असल्यास चर खोदून पाणी ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
3. उभ्या पिकात दोन्ही रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्माची एकरी 1 किलो भुकटी 20 – 25 किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे वापरावी.
4. शेतात पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे.
5. रोगाची रोपावस्थेत तीव्रता आढळल्यास शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
डॉ. ए. एन. पाटील, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. मोबा. 9766170195
फायद्याची माहिती : असे करा हरभर्यावरील घाटेअळीचे नियंत्रण
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1