बंगालच्या उपसागरातील वादळी प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता असून, आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
फायद्याची बातमी : सीताफळाचे जास्त पैसे मिळवण्यासाठी झाडाला कमी फळे ठेवा : डॉ. कसपटे
राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली असून, रविवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारात यंदाच्या हंगामातील नीचांकी 10 अंश तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी अधिक होत आहे. राजस्थानामधील चूरू येथे रविवारी देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, 5.5 अंशांपर्यंत खाली घसरलेला पारा पुन्हा 10 अंशांवर पोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.
उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांशी भागात रविवारी ढगाळ वातावरण राहिले. आज (ता. 12) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महत्त्वाची बातमी : स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळल्यानंतर केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली अरबी समुद्रात येताच उद्या (ता. १३) पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी :
राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी पी. आर. पाटील यांची वर्णी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1