मराठवाड्यासह आज सोलापूर, नांदेड व कर्नाटकातील काही तालुक्यात दर्श-वेळ अमावस्या मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. आज या भागातील शेतशिवारात ओलगे… ओलगे… सालन पोलगे… असा गजर घुमला. पांडवाची आणि काळ्या आईच्या पूजेसाठी शेतशिवार माणसांनी फुलून गेला. पूजेनंतर प्रत्येक शेतशिवारात जागोजागी शेतकर्यांनी मित्र नातेवाईकांसह वनभोजनाचा आस्वाद घेतला. यामुळे आज शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य दिसून आले.
मोठा निर्णय : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
आज वेळ अमावस्थेनिमित्त शेतशिवारात कडब्याची कोप तयार करून त्यावर शांल पांघरली जाते. या कोपीमध्ये दगडाचे पाच पांडव बसवले जातात. शिवाय लक्ष्मी तयार केली जाते. त्यांच्या पुढे मातीचे मडके (मोरवा) पांढऱ्या चुन्याने रंगवून त्यामध्ये कणकेचा दिवा ठेवला जातो. यांची पूजा आजच्या दिवशी सहकुटुंब केली जाते. पुजा झाल्यानंतर ओलगे… ओलगे… सालन पोलगे… असा जयघोष केला जातो. पूजा करून आरती झाल्यानंतर तयार केलेले अंबील आणि बाजरीचे उंडे एकत्र करून रब्बी हंगामातील पिकांवर ते शिंपडले जाते. शेतात पीक चांगले येवू दे… पिकांना चांगला बाजार भाव मिळू दे यासाठी प्रार्थना केली जाते. अशा प्रकारे काळ्या आईला धन्यवाद दिले जातात. वेळ अमास्येची ही प्रथा आजण सर्वत्र पहावयास मिळाली.
ब्रेकिंग : किसान सभेचा सोमवारी नागपूर विधिमंडळावर मोर्चा
मुळात कर्नाटकमध्ये येळ म्हणजे सात आणि जून महिन्यापासून येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळवस याचाच अपभ्रंश होवून वेळ अमावस्या असे याचे नाव पडले आहे. आज मराठवाड्यासह सोलापूर, नांदेड जिल्ह्यात वेळ अमावस्या साजरी करण्यात आली. या भागातील शेतशिवार माणसांनी फुलून गेले होते. शेता अंबिल व मजीवर ताव मारून प्रत्येकजण आनंदी झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले.
आज मराठवाड्यातील गावा-गावात मित्र परिवारासह निसर्गरम्य वातावरणात अंबील, उंडे, रोडगा व सर्व भाज्या एकत्र करून तयार केलेली गरगट्टा भाजी, तांदळाची तसेच गव्हाची खीर, भात, बाजरीची भाकरी, कोंदीची भाकर, कडक भाकर, छपाटे, गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या, वांग्याचे भरीत अशा अनेक पदार्भांचा मेन्यू शेतशिवारांत झालेल्या पंतीमध्ये आज दिसून आला. शिवाय या पदार्थांबरोबरच दिवसभर रानावणात भटकत ढाळे, पेरू, ऊस, बोर अशा रानमेव्याचा अस्वाद अनेकांनी वेळ अमावस्येच्या निमित्ताने आज घेतला.
हे नक्की वाचा : स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1