सरत्या वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सक्तीची वीजबील वसूलीने अक्षरश: हैराण झाला आहे. असे असताना नव्या वर्षात खताच्या किंमती वाढण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. रासायकि खताच्या किमतीत 40 टक्क्याने वाढ झाल्याने नवीन वर्षात शेतकऱ्यांना खत महागाईची झळ बसणार आहे.
मोठा निर्णय : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
यंदा चांगला पाऊस झाल्याने शेती सिंचनाचा प्रश्न सोपा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, मका, उन्हाळी सोयाबीन आदी पिकांची पेरणी झाली आहे. तसेच भाजीपाला लागवडही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र असे असताना मात्र खताच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे येणारे नवे वर्षे शेतकऱ्यांना सुखाचे जाणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी रसायनिक खताच्या किमतीत वाढ होऊन आता खताचे भाव गगनाला भिडले आहेत. परिणामी खताचा शेतातील वापर निम्म्याने कमी झाला आहे. मात्र पेरणी केल्यानंतर पिकाची झपाट्याने वाढ होण्यासाठी युरिया खताची शेतकऱ्यांना आवश्यकता लागते. मात्र युरीयाच्या किमती वाढल्याने मागणी मंदावली आहे. मात्र खताचा तुटवडाही अनेक ठिकाणी जाणवत आहे. सरकार खताचा पुरेसा साठा असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी मागणी करूनही युरीया खत मिळत असल्याने शेतकरी आडचणीत आले आहेत.
हे नक्की वाचा : स्वावलंबनासाठी शेतीसोबत जोडव्यवसायाचे ज्ञान आवश्यक : राज्यपाल
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1