अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वारंवार पूर येत आहे. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होत आहे. यावर कायमचा उपाय करण्याची गरज असताना आता कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना येणाऱ्या पुराचा धोका वाढला आहे.
मोठी बातमी : खतांच्या किमतीत 40 टक्क्यांनी वाढ
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेपासून 235 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण बांधले आहे. दरम्यान, या धरणामध्ये पाणी साठवण सुरुवात झाल्यापासून 2005, 2009, 2013 आणि 2019 असा चारवेळा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर आला आहे. यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे असताना कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
याबाबत माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारला विचारणा केली असून, अलमट्टीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात का ? आणि याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का ? अशी विचारणाही राज्य सरकारकडे केली आहे. यावरून मुश्रीफ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्षही वेधले आहे.
असे असतानाही कर्नाटक सरकारने या धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे कोल्हापूर सांगलीसाठी धोक्याचे आहे. यामुळे यावरून राजकारण तापले आहे.
मोठा निर्णय : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांसाठी भरपाई देणार : उपमुख्यमंत्री फडणवीस
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1