सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आमचे सरकारचे काम सुरु असून, सिल्लोड येथे आयोजित केलेल्या या सिल्लोड कृषी महोत्सवातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवावे, याची माहिती मिळेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ब्रेकिंग न्यूज : कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार
सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. 40 एकरावर हा कृषी महोत्सव भरवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे याची माहिती प्रदर्शनात मिळेल. शेतकरी मोठा उद्योजक होऊ शकतो याची देखील माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळेल. यातून शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल. नक्कीच त्यांच्या आयुष्यात बदल होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी आमचे सरकार काम करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
हे नक्की वाचा : भारत हा जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश : शरद पवार
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, लाखो शेतकरी याठिकाणी उपस्थित आहेत. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळायला हवी. पौष्टीक तृणधान्याच्या लागवडीची सुरुवात सिल्लोडमधून होत आहे. त्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे या कृषी महोत्सवासाठी त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.
या कृषी महोत्सवा विविध पिकाचे, फळ पिकांची तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. तसेच विविध कंपनीचे स्टॉल्स आहेत.
मोठी बातमी : उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसात तक्रार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1