सध्या शेतकऱ्याची वीज कनेक्शन पुन्हा एकदा तोडली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना आता बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. वीज तोडल्याने एका शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ करत विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.
हे नक्की वाचा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सरकारचे काम सुरु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील नारायण वाघमोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रब्बीच्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतानाच महावितरणकडून वीज कनेक्शन बंद करण्यात आले. वीज बंद झाल्याने उभे पीक पाण्याअभावी जळत सल्याचे पाहून या नारायण वाघमोडे शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत विष प्राशन केले. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नारायण वाघमोडे यांच्या शेतातील वीज कनेक्शन बिलापोटी कट करण्यात आले आहे. त्यामुळे डोळ्यासमोर पीके जळत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या हंगामात हातात काहीच आली नाही. त्यामुळे किमान रब्बीत तरी काही हाती येईल, म्हणून नारायण वाघमोडे यांनी पेरणी करून पीक जगवण्याचा प्रयत्न सुरु होता. असे असतानाच त्यांच्या शेतातील वीज तोडण्यात आली. त्यामुळे ते हताश झाले आही त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
ब्रेकिंग न्यूज : कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार
वाघमोडे यांनी व्हिडीओ करताना विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लाईव्ह व्हिडिओ पाहून गावातील काही तरुणांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना बीडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, राज्यात महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी सक्तीची कारवाई सुरु आहे. सक्तीची वीज बिल वसुली न करता, कोणत्याही शेतकऱ्याचे थेट वीज कनेक्शन खंडीत करू नयेत असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र असे असतांना देखील अनेक ठिकाणी सक्तीची वीज बिल वसुली सुरूच आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
हे नक्की वाचा : भारत हा जगात सर्वात जास्त फळ उत्पादन करणारा देश : शरद पवार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1