शेतकऱ्यांच्या मागे लागलेले संकटाचे चक्र काही थांबायला तयार नाही. अतिरिक्त पाऊस, वीजेची तोडणी आणि आता जिल्हा बँकेने उचलेले पाऊल नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी धक्काच आहे. त्यामुळे सध्या नाशिकमधील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. याचे कारण म्हणजे नाशिक जिल्हा बँकेने 62 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या जमीनी जाणार असून हे शेतकरी भूमिहीन होणार की काय ? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रेकिंग : वीज तोडल्याने शेतकऱ्याने विष घेत केला लाईव्ह व्हिडीओ
नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जफेड करणे अशक्य असल्यामुळे बँकेने या शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातले साधारणता 50 हजारापेक्षा जास्त शेतकरी हे भूमिहीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्हा बँकेकडून सुरु करण्यात आलेल्या या लिलाव प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. मात्र आडचणीत आलेल्या या शेतकऱ्यांच्यामागे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी राहिली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमकपणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
नाशिक जिल्हा बँकेकडून सुरु करण्यात आलेल्या या लिलाव प्रक्रियेला विरोध दर्शविण्यासाठी नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर 16 जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.
हे नक्की वाचा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सरकारचे काम सुरु : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सतत अवकाळी, कोरोना, पडलेले बाजार भाव यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच त्रस्त झाले आहेत. त्यात जिल्हा बँकेने आवाजावी व्याज लावून शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. अनेक पट या बँकेने व्याज लावल्यामुळे शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याज हे जमिनीच्या किंमतीपेक्षा देखील जास्त झाले आहे. असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, 16 तारखेपर्यंत सरकारने योग्य तो निर्णय घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी लाखोच्या संख्येने बिऱ्हाड घेऊन मालेगाव येथे पालकमंत्र्यांच्या दारात बसतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनाची गावागावात जागृती सभा सुरु झाल्या असून, कृती समिती सोबत विविध पक्षातील नेते देखील यात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना व कृती समिती यांनी पुढाकार घेतला आहे.
ब्रेकिंग न्यूज : कृषी ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1