सोलापूर जिल्ह्यासह नगर आणि पुणे जिल्ह्यासाठी वरदायणी ठरणाऱ्या उजनी धरण जानेवारी महिना उजाडला तरी अजून हाऊसफुल्ल आहे. पावसाळा संपून अडीच महिने झाले तरी उजनी धरणात 100 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्या मंगळवार, दि. 17 जानेवारीपासून धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा : गुरुकुंज मोझरी येथे दहावे अखिल भारतीय शेतकरी मराठी साहित्य संमेलन
भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून, सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता 123 टीएमसीपर्यंत आहे. धरणातून सीमा-माढा, दहिगाव या योजनांमधून शेतीला पाणी दिले जाते. कॅनॉल व बोगद्यातूनही शेतीला पाणी दिले जाते. तसेच भीमा नदीतून सोलापूर शहराला पाणी सोडले जाते.
यंदा परतीच्या पावसाचा लांबलेला मुक्काम धरणाच्या पथ्यावर पडला आहे. शिवाय यंदा धरण दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी पावसाळ्यात नदीतून सोडूनही धरण अद्यापही हाऊसफुल्लच आहे. पावसाळा संपून अडीच महिने होऊनही सध्या उजनी धरणातील पाणीसाठ 100.45 टक्के आहे. सलग तीन वर्ष 2020 पासून धरणात जानेवारीत शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध राहत असल्याने, पाणलोट क्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
टिप्स : डाळिंबावरील तेल्या रोगाचे व्यवस्थापन
उजनी धरणाचा पाणलोट क्षेत्राचा पट्टा मोठा असून, सुमारे 6 किलोमीटरहून अधिक रुंदी व 140 किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर 40 हून अधिक साखर कारखाने, 15 औद्योगिक वसाहती, शेती व शेतीपुरक व्यवसाय, गोड्या पाण्यातील मासेमारी, असे व्यवसाय अवलंबून आहेत. उजनीच्या पाण्यावर अनेकांचे उदरनिर्वाह चालतात. दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होते. याच पाण्याचा वापर करुन येथील जलविद्युत केंद्रातून सुमारे तीन कोटीहून अधिक युनिट वीजनिर्मिती केली. त्यामुळे येथील वीजनिर्मितीचे सगळे रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत.
आता धरणातून उद्या 17 जानेवारीपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. तर सोलापूर शहरातील नागरिकांसाठी 20 ते 25 जानेवारी दरम्यान भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार आहे. अजूनही धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने यंदा उन्हाळ्यात धरण मायनसमध्ये जाणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ब्रेकिंग न्यूज : हवामानातील बदलामुळे रब्बी पिके धोक्यात
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1