देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या 2022-23 च्या आर्थिक अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आल्या. आजच्या या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी 186 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पात हरित शेती, हरित ऊर्जा यावर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी कृषी वर्धन निधी सुरू करण्याबरोबरच शेतीशी संबंधित स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केलीयावेळी केली.
अर्थसंकल्प 2023-24 : या 11 अपेक्षा ! या 11 घोषणा ?
प्रामुख्याने कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. शेती आणि ग्रामीण भागातील स्टार्टअपला चालना देण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतीतील समस्यांवर सहज सर्वसमावेशक अशी माहिती डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. तर आत्मनिर्भर भारतअंतर्गत फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पांत शेती कर्जासाठी 20 लाख कोटी रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
मोठा निर्णय : देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार
आजच्या अर्थसंकल्पात फलोत्पादनाचे उत्पादन वाढीवर भर देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन, दुगधव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी 20 लाख कोटींची तरतुद करण्यात आली आहे. तर भरडधान्य उत्पादनावर विशेष भर देण्यात आला असून, भरडधान्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘श्री अन्न’ योजना राबविण्यात येणार आहे. भरडधान्यावर संशोधन करणाऱ्या ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च’ संस्थेला मदत करण्यात येणार आहे. नाशवंत शेतमालाची नासाडी रोखण्यासाठी देशात शीतगृह उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील अडचणीवर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मात करण्यात येणार असल्याची घोषणा करून, यासाठी देशात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी 3 केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच देशातील धान्य उत्पादन मागील 8 वर्षात 250 दशलक्ष टनांवरून 310 दशलक्ष टनांवर नेण्याची घोषणा करण्यात आली आहे.
नवे तंत्र : जाणून घ्या ! हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीचे तंत्र
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1