केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल दि. 1 (बुधवारी) 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजनांची घोषणाही करण्यात आली. मात्र प्रत्येक्षात यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी काय मिळाले हे महत्त्वाचे आहे.
अर्थसंकल्प 2023-24 : शेतकऱ्यांची मोठी निराशा करणारा अर्थसंकल्प : डॉ. अजित नवले यांची टीका
विरोधकांनी शेतकऱ्यांची मोठी निराशा करणारा अर्थसंकल्प अशा शब्दात अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. तर अर्थमंत्र्यांनी शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्यात आल्याचे सांगितले असून, मागील आठ वर्षात शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात आल्याचा व मागील 8 वर्षात देशातील धान्य उत्पादन 250 दशलक्ष टनांवरून 310 दशलक्ष टनावर गेल्याचाही दावाही अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
अर्थसंकल्प 2023-24 : कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 186 लाख कोटीची तरतूद
प्रत्येक्षात यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी काय ?
1. अर्थसंकल्पात शेती क्षेत्राच्या विकासासाठी आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर भर देण्यात आला आहे.
2. अर्थसंकल्पात शेती कर्जासाठी 20 लाख कोटी रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
3. अर्थसंकल्पात शेती व पूरक उद्योगांसाठी 84 हजार 214 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
4. अर्थसंकल्पात पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यशेतीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
5. किसान क्रेडिट कार्ड मर्यादा 20 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे.
6. लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्प 2023-24 : या 11 अपेक्षा ! या 11 घोषणा ?
7. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे.
8. हैदराबादमधील भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेला सेन्टर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
9. ग्रामीण भागातील स्टार्टअपला चालना देण्यासाठी अॅग्रिकल्चर अॅक्सिलरेशन फंडची घोषणा करण्यात आली आहे.
10. अर्थसंकल्पात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची घोषणा करण्यात आली असून, पीक नियोजन, पिककर्ज, विमा, मार्केट इन्टेलिजन्ल, स्टार्टअप, शेती तंत्रज्ञान उद्योगांसाठी त्याचा फायदा होणार आहे.
11. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1 कोटी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून, त्यामुळे फळ, भाजीपाला पिकांचे रोगमुक्त, दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रोत्साहन मिळणार आहे.
12. अर्थसंकल्पात लांब धाग्याच्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी क्लस्टर आणि मूल्यसाखळी विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
13. शेतीमधील नाशवंत मालाची नासाडी रोखण्यासाठी साठवणूक सुविधा वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आली असून, त्यासाठी देशात शीतगृह उभारण्यासाठी विशेष प्रोहत्सान देण्यात येणार आहे.
14. देशातील कृषी क्षेत्रातील अडचणीवर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मात करण्यात येणार असून, त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संशोधनासाठी 3 केंद्र उभारण्यात येणार आहेत.
मोठा निर्णय : देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1