कलिंगडाच्या दरात मोठी घसरण झाल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्राबरोबरच तळकोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या प्रति किलोला कवडीमोल असा तीन ते पाच रुपये दर मिळत आहे. यंदा कलिंगडाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा जास्त पुरवढा होत आहे. त्यामुळे कलिंगड व्यापारी खरेदीसाठी म्हणावे असे उत्सूक नाहीत. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची कलिंगडे तशीच शेतात पडून आहेत.
हे नक्की वाचा : PM किसान योजनेच्या रकमेत वाढ होणार का ?
महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी हंगामात बागायती पीक म्हणून घेतले जाते. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात केली जाते. त्याबरोबरच धुळे, जळगाव तसेच विदर्भातीलही कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागवड केली जाते. कमी कालावधी व उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना हे पीक घेणे शक्य असल्याने व कलिंगड गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांचे आवडते व परवडणारे तसेच आकर्षित करणारे फळ असल्याने याची लागवड वाढली आहे.

यंदा मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि पुणे, सोलापूर बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात आलेली कलिंगडे यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. दर नसल्यामुळे बाजारात कलिंगड नेऊन काय करणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कलिंगड शेतातच पडून आहे. याचा मोठा आर्थिक फटका कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे भविष्यात कलिंगड लागवडीवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.
लक्षवेधी प्रयोग :
पाथरुड परिसरात शेकडो एकर ज्वारी ठिबकवर
कलिंगडाचे उत्पादन हे 75 ते 80 दिवसांमध्ये मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षात कलिंगड लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. कलिंगड लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्याने युवा पिढी देखील कलिंगड शेतीकडे वळली आहे. मात्र, कलिंगडाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या कलिंगडाचा दर तीन ते पाच रुपयांपर्यत घसरला आहे. तरी देखील व्यापारी कलिंगड खरेदी करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच सडत आहे.

दरवर्षी कलिंगडला 12 ते 15 रुपये किलोचा दर मिळत असतो. यावर्षी मात्र, कलिंगडाला प्रति किलोसाठी 3 ते 5 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कलिंगड हे नाशिवंत असल्यामुळं शेतातचे ते सडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
चिंताजनक : यंदा यामुळे घटणार गहू आणि हरभऱ्याचे उत्पादन !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1