गेल्यावर्षी दीर्घकाळ पडलेला संततधार पाऊस, त्यानंतर आलेली कडाक्याची थंडी आणि आता उन्हाळ्याची वाढत असलेली तिव्रता यामुळे यंदा पाऊस कसा असेल ? हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. अशातच अमेरिकेच्या हवामान विभागाने भारतीयांची चिंता वाढविणारा एक धक्कादायक अहवाला सादर केला आहे. या अहवालात अल-निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.
महत्त्वाची माहिती : शाश्वत शेतीमध्ये सेन्द्रीये कर्बाचे महत्व
गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. जूनपासून सुरू झालेला पाऊस डिसेंबरपर्यंत सुरू होता. त्यामुळे खरीप हंगाम पार गेला. काही प्रमाणात रब्बीवरही त्याचा परिणाम झाला. राज्यातील मराठवाड्यात गेल्यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा 80 टक्के तर नाशिक, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के पाऊस झाला. उर्वरीत 17 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात यंदा कसा पाऊस असेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच अमेरीकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे.

अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) या हवामान विभागाने हा अहवाल प्रसिध्द करून भारताला इशारा दिला आहे. त्या अहवालात म्हटले आहे की, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये अल निनो परिस्थिती निर्माण होण्याची 50 टक्के शक्यता आहे. तसेच भारतात ही अल निनोची परिस्थिती प्रचलित असण्याच्या शक्यतेवर NOAA ने म्हटले आहे की, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक म्हणजे 58 टक्के आहे. जरी एल निनोचा संबंध कमी पावसाशी असला तरी उपलब्ध आकडेवारीवरून लवकर अंदाज बांधता येणार नसल्याचे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. मान्सूनवर अल निनोच्या प्रभावाचा परिणाम एप्रिल-मे महिन्यातच समोर येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
मोठी बातमी : द्राक्षाचा नवीन लाल-मधुर वाण विकसित
या अहवालात जून ते ऑगस्ट दरम्यान सरासरी पेक्षा कमी पाऊस भारतात पडेल असे म्हटले असून, अल निनो ची परिस्थिती ही जून ते ऑगस्ट दरम्यान राहणार असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्ताचे म्हटले आहे. भारतीय मान्सून हा जून ते सप्टेंबर पर्यंत राहतो आणि याच काळात अल निनो ही हवामान प्रणाली सक्रीय राहणार असल्याने यंदा पाऊस कमी राहील असा अंदाज अमेरिकेतील हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

दरम्यान, भारतात जवळपास तीन वर्षांपासून मान्सून काळात समाधानकारक आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. या अल निनो मुळे यंदा मात्र संपूर्ण देशभरात सरासरी पेक्षा कमी पाऊस पावसाळी काळात कोसळणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची दाट शक्यता आहे.
हे वाचा : कणेरी मठ येथे सोमवारपासून पंचमहाभूत लोकोत्सव
मात्र काही भारतीय तज्ञांनी सलग दोन महिने एखादी संस्था जर असा अंदाज बांधत असेल तर यावर गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केल आहे. एकंदरीत पुढील काही महिन्यात या हवामान प्रणालीबाबत योग्य ती माहिती समोर येईल आणि तेव्हाच भारतीय मान्सून यंदा कसा असेल याबाबत स्पष्टोक्ती येणार आहे.

अल निनो हा हवामान प्रणालीचा एक भाग आहे. हवामानावर त्याचा खोल परिणाम होतो. एल निनो परिस्थिती साधारणपणे दर तीन ते सहा वर्षांनी उद्भवते. पूर्व आणि मध्य विषुववृत्तीय पॅसिफिकमधील असामान्यपणे उबदार महासागराच्या पृष्ठभागाच्या पाण्याला एल निनो स्थिती म्हणतात. एल निनोच्या स्थितीमुळे वाऱ्याची पद्धत बदलते आणि त्यामुळे जगाच्या अनेक भागांमध्ये हवामानावर परिणाम होतो.
ब्रेकिंग : स्वाभिमानीचे 22 पासून राज्यभर चक्का जाम !

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1