राज्याच्या विविध भागात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका द्राक्ष व आंब्यासह रब्बी पिकांना बसला आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यासह धुळे, वाशिम, बुलढाणा, पालघर, नगर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील ऐन काढणीला आलेल्या शेती पिकांना या पावसाचा तडाखा बसला आहे.
हे नक्की वाचा : पंजाबरावही म्हणतात…. 10 मार्चपर्यंत पाऊस !
या पावसाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. या अवकाळी पावसाने नाशिक जिल्हा पूर्ण झोडपून काढला आहे. यामध्ये द्राक्ष बागेबरोबरच कांदा, गहू यांसह हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण, सिन्नर, निफाड तालुक्यासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. इगतपुरी तालुक्यात मध्यरात्री गारांचा पाऊस पडला आहे.
पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे आंबा पिकासह रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तुर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. आंबा बगायतदारांचेही यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. आंबाच्या झाडांना मोहर आला असून काही भागात सुपारीच्या आकाराचे आंबे लागले आहेत. जोरदार पावसाच्या माऱ्यानं हे छोट्या आकाराचे आंबे झाडावरुन गळून पडले आहेत. तर काही भागातील मोहरही गळून गेला आहे.
ब्रेकिंग : मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यांसह धुळे तालुक्यात मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पिकावर रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. एकीकडं कांद्यासह भाजीपाल्याला भाव नाही, दुसरीकडे पुन्हा अस्मानी संकट आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
ब्रेकिंग : कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1