सध्या कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही बाजार समितीमध्ये अद्याप नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
अर्थसंकल्प : कृषी क्षेत्रासाठी ‘या’ महत्त्वाच्या घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्याचे आश्वासन सहा दिवसापूर्वी सभागृहात दिले होते. मात्र अध्यापी बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन हवेतच विरलं की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारत जात आहे.
कांद्याला कमीत कमी प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांचा दर अपेक्षित आहे. दोन हजार रुपयांचा दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या हातात थोडेफार पैसे राहतील. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांच्या कांद्याची विक्री सुरु आहे. मात्र, अद्यापही दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
मोठी घोषणा : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा : मुख्यमंत्री शिंदे
विधामंडळाच्या अधिवेशनात कांदा प्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आल्याचे सांगितले होते. शिवाय बाजार समितीमध्ये लवकरच कांदा खरेदी केंद्रे सुरु करण्यात येतील असेही आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नाफेडकडून बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु झाली नसल्याचे चित्र आहे. सध्या महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडकडून कांद्याची खरेदी सुरु आहे. मात्र, नाफेडमध्ये खरेदी सुरु नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
मोठी बातमी : अवकाळी पावसाने पुन्हा शेती पिकांना मोठा फटका
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1