राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, काल नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आजपासून राज्यात विजांच्या गडगडासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.
आनंदाची बातमी : जालना येथे बियाणे पार्क उभारणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार
राज्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, कमाल तापमान कमी – अधिक होत आहे. कमाल तापमान 37 अंशांच्या पुढे असल्याने, तसेच तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी वाढ झाल्याने सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे गेले काही दिवस उष्णतेची लाट कायम होती. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान 34 ते 38 अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे.
दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. झारखंड ते तेलंगणा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण झाले असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मोठी बातमी : नाफेडने कांदा किमान 1200 रुपयांनी खरेदी करावा : शरद पवार
अशा प्रकारे राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाल्याने आज राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात काही जिल्ह्यात वारे ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वहातील व विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हे नक्की वाचा : फडणवीसांच्या आश्वासनानंतरही नाफेडकडून कांद्याची खरेदी नाही
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1