शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत : राज्यपाल रमेश बैस

0
362

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा दीक्षान्‍त समारोह

देश कृषी प्रधान असल्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात देखील देशाला त्याची झळ बसली नाही. देशाचे भवितव्य कृषी विकासात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कधीही विकू नये. कृषीच्या माध्यमातून देशाला फार पुढे नेता येईल. त्यामुळे कृषी स्नातकांनी शेतीकडे वळावे व कृषी विकासात मोठे योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

मोठी बातमी : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान

राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४१ वा दीक्षांत समारोह झाला. त्यावेळी स्नातकांना संबोधित करताना ते बोलत होते.

महाराष्ट्रात राज्यपाल झाल्यावर आपला पहिला सार्वजनिक कार्यक्रम देश विकासात योगदान देणाऱ्या एका कृषी विद्यापीठात होत आहे याचा आपल्याला आनंद होत असल्याचे सांगून, राज्यपाल बैस म्हणाले, पूर्वी लोक पैसे मिळाले, तर दोन-चार एकर जमीन घेत. परंतु आजकाल जमिनीला चांगला मोबदला मिळाला, तर लोक शेतजमीन विकून टाकतात. त्या पैशातून घर, गाडी घेतात. अशा प्रकारे अनेक गावातील लोकांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत आणि एकेकाळी शेतमालक असेलेले लोक आज शेतमजूर झाले आहेत. कृषी स्नातकांनी शिक्षण प्राप्त केल्यानंतर गावात जाऊन अनुकरणीय शेती करावी, असे आवाहन करून राज्यपाल बैस म्हणाले, शेतीला उद्योगाची जोड द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आनंदाची बातमी : जालना येथे बियाणे पार्क उभारणार : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून शासनाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध निर्णयांची व योजनांची माहिती दिली. कृषी स्नातकांना शेतीसाठी मदत करण्यासाठी आपण नेहमी खंबीरपणे पाठिशी उभे राहू, असे आश्वासन त्यांनी यावेळी केले.

कृषी विद्यापीठे ही अन्नब्रह्म मंदिरे : डॉ. एस. अय्यप्पन

देशातील कृषी विद्यापीठांच्या योगदानामुळे आज भारत अन्नधान्याच्या उत्पादनात केवळ स्वयंपूर्णच नाही, तर निर्यातदार देखील झाला आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधनातून निर्माण केलेल्या वाणांमुळे हे शक्य झाले आहे, असे सांगताना देशातील ७५ कृषी विद्यापीठे ही अन्नब्रह्माची मंदिरेच आहेत, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ. एस. अय्यप्पन यांनी यावेळी केले.

हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, पाणी व ऊर्जेची वाढीव गरज ही कृषी क्षेत्रापुढील आव्हाने असून देशातील १६० कोटी जनतेला अन्नसुरक्षा देण्याकरिता सन २०४७ पर्यंत अन्नधान्य उत्पादन दुप्पट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील कृषी विद्यापीठांमधून दरवर्षी १ लक्ष कृषी स्नातक तयार होत असून त्यांनी कार्यक्षम कृषी, स्मार्ट फार्मिंग व ज्ञानाधिष्ठित कृषी तसेच कृषी स्टार्टअप सुरु केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मोठी बातमी : नाफेडने कांदा किमान 1200 रुपयांनी खरेदी करावा : शरद पवार

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here