विविध मागण्यांसाठी निघालेला शेतकरी लाँग मार्च राज्य सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला आहे. किसान सभेचे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी ही माहिती दिली. तसेच जवळजवळ 70 टक्के मागण्या मान्य करून, राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी सरकारचे देखील आभार मानले आहे.
मोठी घोषणा : शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी : मुख्यमंत्री शिंदे
नाशिकहून मुबंईच्या दिशेने निघालेला शेतकरी लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.
किसान सभेच्या बारा जणांच्या शिष्टमंडळाची गुरूवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. तर काही मागण्यांसदर्भात एक समितीही गठित करण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात विधानसभेत निवेदन दिले.
अधिवेशन वार्ता : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची मुख्यमंत्र्याची विधानसभेत ग्वाही
तत्पूर्वी आंदोलन मागे घेण्यासंदर्भातील शासकीय प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी शेतकरी थांबलेल्या आंदोलनस्थळी जाणार असून, यावेळी किसान सभेचे नेते गावितही त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यानंतर अधिकृतरित्या हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात येणार आहे. यावेळी गावित हे शेतकऱ्यांना संबोधित करतील. त्यामुळे आजच शेतकरी आपल्या घरी रवाना होण्याची शक्यता आहे.
शेतकरी आंदोलनावर सकारात्मक मार्ग निघाल्यानंतर शेतकरी लाँग मार्च स्थगित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून 10 बसेस तर ठाणे महानगर पालिकेकडून पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाकडून दोन रेल्वे गाड्याही तयार ठेवण्यात आल्या आहेत. वाशिंद रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाड्या नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत. तर एसटी बसेस वाशिंदच्या मैदानावरूनच रवाना होणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्या कालच पूर्ण झाल्या होत्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी ही आजपासून होणार आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आज आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी हजारोंच्या संख्यने मुंबईच्या दिशेने येणारे शेतकीर आंदोलन आता स्थगित झाले आहे.
ब्रेकिंग : शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज देऊ : उपमुख्यमंत्री फडणवीस
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1