मोत्यांची शेती या व्यवसायाला आज सर्वमान्य झाला आहे. वास्तविक मोत्याची शेती हा मत्स्यपालनाचाच एक भाग म्हणता येईल. समुद्रातून मोती काढणे आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे, आता मोत्यांच्या शेतीचे ज्ञान प्रशिक्षणातून घेता येते. मोत्यांची शेती या व्यवसायात ऑयस्टर पाळले जातात. मात्र मोत्यांची उत्पादन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यातून खूप महागडे मोती मिळतात. सध्या देशात हजारो शेतकरी मोत्यांच्या शेतीतून चांगले अर्थाजन करीत असल्याची उदाहरणे आहेत. अभ्यासपूर्ण शेती करणाऱ्या युवा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातूनही मोत्यांची शेती हा चांगला पर्याय आहे.
मोत्यांची शेती या व्यवसायातून महागडे असे मोती मिळवता येऊ शकतात. एका दृष्टीकोनातून पहिले तर मोत्याची शेती करणे हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकते. मोत्याचे उत्पादन ही एक नैसर्गिक प्रकिया असून, यामध्ये ऑइस्टर 8 ते 10 महिने पाण्यामध्ये पाळले जातात. मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या बायव्हाल्व्हिया या वर्गात ऑयस्टरांचा समावेश होतो. हे एका जातीचे कालव आहे. ऑयस्टराचे शरीर मऊ असून कवचाने झाकलेले असते कवचाची दोन पुटे असून ती बिजागरीने जोडलेली असतात. ऑयस्टर समुद्रात राहणारे असून उष्णकटिबंधांतील सर्व समुद्रांत आढळतात ते समुद्र किनाऱ्यावर भरती – ओहोटीच्या मधील क्षेत्रात आणि खाड्यांच्या उथळ पाण्यात आढळतात. वाढ झालेले ऑयस्टर समुद्रतळावर असतात किंवा त्यांच्या डाव्या पुटांनी (शिंपांनी) खडकांना अथवा पाण्यातील पदार्थांना चिकटलेले असतात. ऑयस्टरांना पाय नसल्यामुळे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत.
मोती ऑइस्टरमध्ये तयार होत असून हा एक नैसर्गिक रत्न आहे. ऑइस्टर म्हणजे काय तर गोगलगाईचे घर होय. गोगलगाई जेव्हा अन्न खाण्यासाठी बाहेर पडते तेव्हा नको असलेले म्हणजेच अनावश्यक परजीवी त्यांच्यासोबत चिटकून शिंपल्यात शिरतात आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी गोगलगायी स्वतःवर संरक्षण कवच बनवते ते कवच नंतर मोत्याचे रूप धारण करते. ही सर्व प्रक्रिया कृत्रिमरीत्या केली जाते तेव्हा यास मोती पालन असे म्हणतात. एका मोत्याची सरासरी किंमत ही 200 ते 2000 रुपयांपर्यंत असते कधी कधी मोती उच्च दर्जाचा असेल तर त्याची किंमत लाखों रुपयांपर्यंत जाते.
मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे जे ऑयस्टरमध्ये तयार होते. ऑयस्टर म्हणजे गोगलगायीचे घर. जेव्हा गोगलगाई अन्न खाण्यासाठी घरातून बाहेर पडते तेव्हा नको असलेले परजीवी देखील त्याच्याशी चिकटून शिंपल्याच्या आत प्रवेश करतात, ज्यापासून मुक्त होण्यासाठी गोगलगाय स्वतःवर एक संरक्षक कवच बनवू लागते, जी नंतर मोत्याचे रूप धारण करते. अशा प्रकारे मोत्यांची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया कृत्रिमरित्या केली जाते तेव्हा त्याला मोती पालन म्हणतात.
मोत्याची शेती हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तलाव, सर्जिकल हाऊस यासाठी एक निश्चित खर्च लागतो. हा खर्च प्रत्येक वेळी येत नाही. एकवेळचीच गुंतवणूक करावी लागते. याशिवाय तलावात वेळोवेळी खत टाकून ठेवावे लागते. तलावातील मृत शिंपले वारंवार बाहेर पडत राहतात, ज्यासाठी थोडाफार खर्च करावा लागतो. कोणताही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्याचे संपूर्ण प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. मोती शेती कारण्यासाठी देखील तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून प्रशिक्षण घेऊ शकता.
मोत्याची शेती करायची असेल तर 20 x 10 आकारमानाचा तलाव असणे आवश्यक आहे. ज्याची खोली 5 ते 6 फूट असली पाहिजे. जर तुमच्याकडे अशी सुविधा नसेल तर तुम्ही घरच्या घरी प्रगत तंत्रज्ञान वापरून टाकी बसवून मोत्याची शेती करू शकता. मोत्यांची शेती कारण्यासाठी प्रौढ ऑइस्टरची आवश्यकता असते तर तुम्हाला हे नदी, तलाव, कालवे आदी ठिकाणांवरून गोळा करता येऊ शकते. तर तुम्ही यांची खरेदी देखील करू शकता. मात्र लक्षात ठेवा त्यांपैकी एकही ऑइस्टर मेलेला नसावा. त्याचा आकार सुमारे 8 ते 10 सेमी असावा. सर्व ऑइस्टर प्रौढ आहेत याची काळजी घेऊन ते अत्यंत काळजीपूर्वक निवडावेत. तुम्हाला हव्या त्या मोत्याच्या आकारानुसार बी निवडावे लागते त्यानंतर बिया बिया शस्त्रक्रियेने ऑयस्टरमध्ये घातल्या जातात आणि 10 दिवस नायलॉन पिशवीत ठेवून त्यांची तपासणी केली जाते. या काळामध्ये ते नैसर्गिक खांद्यावर ठेवले जातात. दरम्यान कोणतेही ऑइस्टर मरण पावल्यास त्यांना फेकून द्यावे लागते. तलावात सीप टाकल्यानंतर त्याची विशेष काळजी घेतली जाते. शिंपल्यातील जीव स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही त्यामुळे त्यांना बाहेरून शेणखत, केळीची साल आदी अन्न पुरवठा करावा लागतो.
जर पहिल्यांदा मोत्यांची शेती सुरू करावयाची झाल्यास एक निश्चित खर्च असतो ज्यामध्ये फक्त एकदाच तलाव, सर्जिकल हाऊस स्थापित करणे आवश्यक असते जेथे शस्त्रक्रिया करण्याचे काम केले जाते. हा खर्च प्रत्येक वेळी करावा लागत नाही. मोत्यांच्या शेतीसाठी सर्जिकल सेट आवश्यक असतो. सर्जिकल हाऊसमध्ये काही टेबल आणि खुर्च्या आवश्यक असतात. ही देखील एक वेळची गुंतवणूक आहे. याशिवाय तलावात वेळोवेळी खत टाकून ठेवावे लागते. तलावातील मृत शिंपले वारंवार बाहेर पडत राहतात, ज्यासाठी काही खर्च करावा लागतो. जर मोठ्या प्रमाणावर मोत्यांची शेती सुरू करावयाची असल्यास कुशल कामगारांची गरज पडते. त्यासाठी खर्चही वेगळा करावा लागतो.
मोत्याची शेती केवळ आर्थिकच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. मोतीमुळे जलप्रदूषणा सारख्या समस्येपासून सुटका मिळू शकते, ते पाणी स्वच्छ करण्याचे काम करते, त्यामुळे पाणी घाण होण्यापासून वाचवता येते. आज जिथे शेतकरी पूर, दुष्काळ यांसारख्या समस्यांना तोंड देत आहेत, तिथे ते मोती शेती, मत्स्यपालन यासारख्या व्यावसायिक शेतीला पारंपारिक शेती जोडून चांगले उत्पन्न मिळवू शकता. या सर्वांशिवाय, मोती हे एक रत्न आहे जे दागिने बनवण्यासाठी वापरले जाते ज्याची बाजारात चांगली किंमत आहे.