राज्यात दहावीनंतर राबविला जाणारा पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम बंद करून बारावीनंतर तीन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आला आहे.
ब्रेकिंग न्यूज : राज्यात उन्हाचा तडाखा अजून वाढणार !
पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत मुंबईत याबाबत नुकतीच बैठक झाली. प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कुलगुरू डॉ. शरद गडाख, सहसचिव माणिक गुट्टे, उपसचिव मकरंद कुळकर्णी, अतिरिक्त आयुक्त शीतल मुकणे, शिक्षण संचालक डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. अजय गावंडे, डॉ. अजय खानविलकर, राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे डॉ. रामदास गाडे, पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे मारुती कानोले, डॉ. सुनील सहातपूरे, अनिल मेहेर उपस्थित होते.

बैठकीत ठरल्यानुसार, पाच सत्र अधिक एक प्रशिक्षण सत्र असे या नव्या अभ्यासक्रमाचे स्वरूप असणार आहे. या पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी 60 विद्यार्थी प्रतिवर्ष एवढी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाद्वारे सध्या पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन हा पदविका अभ्यासक्रम दहावीनंतर राबविला जात आहे. त्याची प्रवेश प्रक्रिया 2023-24 या शैक्षणिक वर्षांपासून बंद करण्यात येणार आहे.
महत्त्वाची बातमी : उसाच्या रसावर आता 12 टक्के जीएसटी
या अभ्यासक्रमास यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ विनियमामध्ये विहित प्रवेश घेतल्यापासून कमाल चार वर्षे कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. हा अभ्यासक्रम बंद करताना आता पदविकेसाठी बारावीची अर्हता निश्चित केली आहे.
या नवीन अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखेत जीवशास्त्र विषयात उत्तीर्ण आवश्यक आहे. हा तीन वर्षांचा पदविका अभ्यासक इंग्रजी माध्यमातून राहणार आहे. या नवीन अभ्यासक्रमासाठी पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, प्रयोगशाळांबाबतचे धोरण ‘माफसू’ दोन महिन्यांत ठरविणार आहे. या नवीन अभ्यासक्रमासाठी विद्यापीठस्तरावर सहआयुक्त (पशुसंवर्धन) दर्जाच्या अधिकारी समाविष्ट सदस्याची समिती गठित करण्याचे प्रस्तावित आहे.
हे वाचा : वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या किमती वधारल्या
या नवीन अभ्यासक्रमासाठी संस्थाचालकांना चार महिन्यांत पायाभूत सुविधांची उपलब्धता करणे बंधनकारक करण्यात आली असून, तसे न केल्यास 2024-25 या वर्षांपासून अभ्यासक्रमास प्रवेश बंद केले जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या निकषांच्या पूर्ततेबाबत पडताळणीसाठी विद्यापीठस्तरीय समिती राहणार आहे. तिच्या अहवालानंतरच विद्यालयास प्रवेश मान्यतेबाबतचा निर्णय दिला जाणार आहे.
या नवीन अभासक्रमाची परीक्षा घेणे, निकाल व गुणपत्रिकेची कार्यवाही सध्याच्या परीक्षा विभागामार्फतच होणार आहे. स्वतंत्र परीक्षा कक्ष स्थापन करण्याबाबत विद्यापीठस्तरावर ठरविण्यात येणार आहे.

पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व दुग्धतंत्रज्ञान विषयाचे कौशल्य विकसित करण्यासाठी व त्याद्वारे स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत ‘माफसू’ला निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
‘माफसू’अंतर्गंत पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन या विद्या शाखेतील कायमस्वरूपी विना अनुदानित खासगी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. तो विधी व न्याय विभागाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
ब्रेकिंग न्यूज : पीक नुकसानीची एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार मिळणार मदत

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1