राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित केले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला.
महत्त्वाची बातमी : राज्यात 3 दिवस पुन्हा यलो अलर्ट !
राज्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली. गेल्या महिन्यातही झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर वारंवार येणाऱ्या या संकटावर मत करण्यासाठी आता अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करताना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे अवकाळी पाऊस हा आता नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरला जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणे आता शक्य होणार आहे.
खूशखबर : आता मराठवाड्यातून थेट होणार आंबा, मोसंबीची निर्यात
दरम्यान, राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण 1 लाख 99 हजार 486 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.
4 ते 20 मार्च 2023 या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळपीके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. दि. 4 ते 9 मार्च 2023 या कालावधीत राज्यातील 38 हजार 606 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. 15 ते 20 मार्च या कालावधीत 1 लाख 60 हजार 880 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण 1 लाख 99 हजार 486 क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.
मोठा निर्णय : दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1