धक्कादायक : मराठवाड्यात रोज 2 शेतकरी करत आहेत आत्महत्या !

0
278

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या 3 महिन्यात मराठवाड्यात तब्बल 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून स्वतःच जीवन संपवून घेतले आहे. एकूण मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे.

ब्रेकिंग : पैसे नसल्याने 15 बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रश्न ?

मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असून, गेल्या 90 दिवसांत बीडमध्ये 65 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पिके वाहून गेली आहेत. काही ठिकाणी तर शेतातील माती देखील वाहून गेली. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशा वैतागला आहे. 

मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कापसासारख्या एक पीक पद्धतीमुळे शेती नुकसानीची होत चालली आहे. मराठवाड्यात पिकणार्‍या कापूस, सोयाबीन, मोसंबी या पिकांना हमी भाव मिळत नसल्याने वरचेवर शेतकरी हतबल होत चालला आहे. कर्ज कसे फेडायचं, बँकेकडून सतत सुरु असलेला तगादा, पैश्यासाठी सावकाराकडून होणारी मागणी आणि त्यात आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने कुटुंब चालवण्याची चिंता असल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याची करणे पुढे आली आहे. यामुळे सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

चर्चेचा विषय : मार्चमधील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

या नवीन वर्षात गेल्या तीन महिन्यांत मराठवाड्यात 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांची ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. सलग तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणारा मराठवाड्यातील शेतकरी कर्ज, नापिकी, नैराश्याला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत आहे.

मोठा निर्णय : यापुढे अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपत्ती

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here