राज्यात काही ठिकाणी दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यानुसार आज सकाळपासूनच बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते, तर काही भागात विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या वादळी व मुसळधार पावसांमुळे शेतकऱ्यांची तांराबळ उडाली असून, या पावसामुळे कांदा आणि फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची चिता वाढली आहे.
मोठी घोषणा : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला संशोधन प्रकल्पांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर
आज काही ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने काही गावांना चांगलच झोडपून काढले आहे. विदर्भात आज सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तर खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी गावासह परिसरामध्ये जवळपास अर्ध्या तासापासून विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बोरीअडगाव परिसरात तुरळक ठिकाणी गारपीट देखील झाली. शेतकऱ्याच्या शेतातील गहू, हरभरा हे पीक घरात आले असले तरी गारपीट आणि अवकाळी पावसाचा कांदा आणि फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आखतवाडे, बिजोटे व भडाणे परिसरात सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अचानक आलेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यासह काढणी आलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. तर आंबा तसेच भाजीपाला व फळबागांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.
धक्कादायक : मराठवाड्यात रोज 2 शेतकरी करत आहेत आत्महत्या !
पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, संध्याकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने, काही गावांना चांगलच झोडपून काढले. साधारण अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसाने आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले. यावेळी नागरिकांची पावसाने मोठी तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा पिकाला याचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वादळी अवकाळी पाऊस झाला. अचानक पडलेल्या पावसामुळे एकच धावपळ, व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे सध्या राहिलेल्या उन्हाळी मूग, कांदाबीज, उत्पादन कांदा, आंबा मोहर, नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ब्रेकिंग : पैसे नसल्याने 15 बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रश्न ?
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1