सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास ‘जीआय’ मानांकनाचे मंगळवारी वितरण

0
559

सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले असून, मंगळवार, दि. 11 एप्रिल रोजी पंढरपूर येथे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते या मानांकनाचे अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्राचे व डाळिंब उत्पादकांना ट्रेडमार्कचे वितरण करण्यात येणार आहे.

हे वाचा : हवामान बदलाचा काजू उत्पादनवर परिणाम

पंढरपुरातील कराड नाक्यानजीक यश पॅलेसमध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे असणार आहेत. यावेळी या जीआय प्रमाणपत्राचा वापर डाळिंब विक्री आणि निर्यातीसाठी कशा प्रकारे करावा, या संदर्भात डाळींब उत्पादकांना प्रशिक्षणही  देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ, कृषी विभाग, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वतीने आणि नाबार्ड, अपेडा, राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुण्याच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

हे नक्की वाचा : राज्यात काही ठिकाणी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, अपेडाच्या उपसरव्यवस्थापक सौ. विनिता सुधांशू, चेन्नईच्या ट्रेडमार्क आणि जीआय विभागाचे वरिष्ठ परीक्षक प्रशांतकुमार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, ‘नाबार्ड’चे व्यवस्थापक नितीन शेळके, डाळिंब केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीलेश गायकवाड, फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे सल्लागार गोविंद हांडे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक राजेंद्र महाजन, डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, माजी अध्यक्ष शहाजीराव जाचक, उपाध्यक्ष प्रताप काटे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक मदन मुकणे यावेळी उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन डाळिंब संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोठी घोषणा : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला संशोधन प्रकल्पांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा 👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here