मराठवाड्याच्या विविध भागांत शुक्रवारी दुपारनंतर विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातला. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री व शनिवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून पाच जणांचा बळी गेला. तर 4 जण जखमी झाले आहेत. मराठवाड्यात 9 ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड जिल्ह्यात प्रत्येकी एक तर हिंगोलीत दोनजण दगावले आहेत. जखमीमध्ये 4 जण छत्रपती संभाजीगनर जिल्ह्यातील आहेत. तसेच या अवकाळी पावसाने चार लहान तर 27 मोठ्या जनावरांचे बळी घेतले आहेत.
आनंदाची बातमी : सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबास ‘जीआय’ मानांकनाचे मंगळवारी वितरण
या पावसाने पिकाचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले असले तरी या वादळी पावसाच्या दणक्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंबयाची मोठी गळ झाली आहे. काढणीला आलेल्या रब्बीतील पिकांसह बाजरी पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत अवकाळीने छत्रपती संभाजीनगर, हिंगोली (मानवत), बीड (आष्टी) या जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तीन व्यक्ती जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12, जालना व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी तीन बीड व लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एक व धाराशिव जिल्ह्यातील चार जनावरांचा मृत्यू झाला.
हे वाचा : हवामान बदलाचा काजू उत्पादनवर परिणाम
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 65 पैकी 61 मंडलांत पाऊस झाला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात सरासरी 22.7 मि.मी पाऊस झाला. पिशोर मंडलात सर्वाधिक 46.6 मि.मी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, अंबाजोगाई तालुक्यांतील काही मंडलात तुरळक पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात सरासरी 8.8 मि.मी, धाराशिवमध्ये सरासरी 0.6 मि.मी तर जालना जिल्ह्यात सरासरी 4.9 मि.मी पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगरच्या सिरसाळा येथे वीज पडून अंबादास भिका राठोड यांचा मृत्यू झाला. याशिवाय 5 गाईंचा मृत्यू झाला. सोयगाव तालुक्यातील वरखेडी येथील 3 व्यक्ती वीज पडून जखमी झाले. कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील 1 बैल व देवपूर येथील 2 बैल मृत झाले. फुलंब्री तालुक्यात रांजणगाव येथे 1 बैल मृत्यूमुखी पडला. पैठण तालुक्यातील मुलांनी वडगाव येथे 1 गाय व 1 बैल मृत झाले.
हे नक्की वाचा : राज्यात काही ठिकाणी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
जालना तालुक्यात कडवंची येथे 1 गाय वीज पडून मृत झाली. भोकरदन तालुक्यात वालसावंगी येथे 1 बैल व आडगाव येथे 1 गाय वीज पडून मृत झाली. लातूर जिल्ह्यातील नेलवाड येथे 1 म्हैस मृत्युमुखी पडली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कुन्हाली येथे 2 म्हैस व हिप्परगाव येथे 1 म्हैस, नाई चाकूर येथे 1 म्हैस मृत्यूमुखी पडली.
मोठी घोषणा : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला संशोधन प्रकल्पांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर
धक्कादायक : मराठवाड्यात रोज 2 शेतकरी करत आहेत आत्महत्या !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1