सध्या तुर्की बाजरीची चर्चा जोरदार सुरु आहे. कारण आहे ; बोरीस (धुळे) येथील शेतकरी डॉक्टर अनिल जैन यांनी तुर्की बाजरीचे घेतलेले उच्चांकी उत्पादन ! डॉ जैन यांनी तुर्की उन्हाळी बाजरी या देशी वाणाच्या उत्पादनातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहेत. त्यांनी या बाजरीचे एकारी 30 क्विंटल उत्पादन घेतले आहे. हा काही पहिलाच प्रयोग नव्हे तर गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी तुर्की बाजरीची लागवड यशस्वी केली आहे.
डख अंदाज : या तारखेला होणार मान्सूनचे आगमन !
आधुनिक शेती प्रयोगातून शेतकरी नैसर्गिक संकटांसह इतर संकटांवरही मात करू शकतो. हे डॉ जैन यांनी आपल्या या प्रयोगातून सिद्ध केले आहे. डॉ. जैन यांनी आजपर्यंत दहा एकर शेतात विविध प्रयोग करत यंदा या तुर्की बाजरीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
खानदेशातील बोरीस हे गाव सती मातेच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील शेतकरी डॉ. जैन हे सध्या तुर्कीच्या बाजरीमुळे तालुक्यात नव्हे तर राज्यात चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी तुर्की देशी वाण बाजरीचा जानेवारी महिन्यात पेरणी केली होती. ही बाजरी आता काढणीला आली आहे.
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
डॉ. जैन यांनी यावर्षी तुर्की देशातील बाजरीचे बियाणे मिळवले. या बाजरीची उंची 10 ते 11 फुटांपर्यंत गेली आहे. याला 3 फुटांपेक्षा अधिक लांबीची कणसे आली आहेत. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे, यामुळे त्यांना एका एकरमध्ये 30 क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल या दराने या बाजरीची विक्री होणार असल्याचे ते सांगतात. विशेष: एका एकरमागे 12 लाख रुपयांचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे.
दरम्यान, याच धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्रयोगशिल शेतकरी किरण शिंदे यांनीही याच तुर्की बाजारी वाणाची 15 एकरवर यशस्वी लागवड केली आहे.
महत्त्वाची बातमी : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे 26 कृषीरत्न पुरस्कार जाहीर
याच धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर (ता. साक्री) येथील प्रयोगशील शेतकरी निसार शेख यांनी गेल्या वर्षी तुर्की बाजरीच्या सदा गोल्ड या वाणाच्या लागवडीचा राज्यातील पहिला यशस्वी प्रयोग केला होता. त्यांनी तुर्केस्थानातून बाजारीचे बी एक हजार रुपये किलो या दराने मागवले होते. त्यांच्याकडील बाजारीचे पीक गेल्यावर्षी 12 फुट उंचीवर गेले होते. मात्र गेल्यावर्षीच्या अतिरिक्त पावसामुळे त्यांना अपेक्षीत उत्पादन काढता आले नाही. तर बारामती तालुक्यातील माळवाडी लाटे येथील शेतकरी मारुती हाके यांनीही गेल्यावर्षी या बाजरीचा प्रयोग केला होता. मात्र जास्तीची माहिती नसल्याने आणि अतिरिक्त पावसामुळे त्यांनाही गेल्यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळवता आले नाही.
तुर्की बाजारीबाबत निसार शेख सांगतात की, पेरणीसाठी एकरी दीड किलो बियाणे लागते. यातून एकरी 60 क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शकते. या बाजरीची चव आपल्या बाजरीपेक्षा थोडी वेगळी आहे. बाजरीचे दाणे थोडे मोठे असून, स्थानीक बाजारात याची विक्री होऊ शकते.
फायद्याच्या टिप्स : उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी
बाजरीच्या पिकाला उष्ण व कोरडे हवामान मानवते. या पिकाची खासियत म्हणजे कमी पावसाच्या (200-600 मीमी) परिस्थितीत याचे उत्तम उत्पादन घेता येते. या पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असल्याने कोरडवाहू शेतात हे पीक चांगले येऊ शकते. दुष्काळी स्थिती, कडक उन्ह आणि अतिरिक्त पाऊसाचा या पिकावर म्हणावा असा परिणाम होत नाही.
बाजरीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हालकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु 6.2 ते 7.7 असावा. कलक्या जमिनीत बाजरीचे पीक घ्यायचे झाल्यास सरी-वरंबा पद्धत फायद्याची ठरते. बाजरीमध्ये पोषक मुलद्रव्यांचे प्रमाण आधिक असल्याने आहाराच्या दृष्टीने बाजरीचे महत्त्व वाढाताना दिसत आहे.
महत्त्वाची माहिती : उन्हाचा चटका वाढतोय ; अशी घ्या आरोग्याची काळजी !
भारतात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, तेलंगना, महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, मध्यप्रदेश आणि हरियानासह 21 राज्यात बाजरीचे लागवड केली जाते. पावसाळी बाजरीचे उत्तर महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने सध्या राजस्थान, गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी भागांतून बाजरी विक्रीसाठी महाराष्ट्रात येत आहे.
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1