राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालघर येथे पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात विभागीय आयुक्तांकडून सरकारला निकषांबाबतचे पत्रही देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ब्रेकिंग न्यूज : तुर्की बाजरीची सध्या जोरदार चर्चा !
सरकर शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना आणणार असल्याचे सांगून कृषिमंत्री सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहेत. शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या आम्ही करू, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
राज्यातील सरकार हे बळीराजाचे सरकार आहे, असा पुनरुच्चार कृषिमंत्री सत्तार यांनी केला. पालघरमध्ये मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवले. या घटनेबाबत संपूर्ण माहिती घेऊ आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे सत्तार यांनी यावेळी सांगितले.
डख अंदाज : या तारखेला होणार मान्सूनचे आगमन !
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1