संपर्ण राज्यात अतिकडक उन्हाचा तडका सुरु आहे. उन्हाचा कडक झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अजूनही उष्णता आणि तापमान दोन्ही वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागांचा पारा 42 अंशाच्या पुढे गेला आहे. यामुळे उष्माघाताचे प्रमाणही वाढले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यभरात 12 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे; तर 2,253 रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
शरद मँगो : शरद पवारांच्या नावाने आंबा !
कडाक्याचे उन्ह आणि दमट उष्णतेमुळे अनेक ठिकाणी दुपारी तापमानाचा चाळीशी गाठत आहे. घामाच्या धारांमुळे अंगाची लाही लाही होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून उष्माघाताचे आजार वाढत आहेत.
अशा कडक उन्हाळ्याच्या परिस्थितीत डॉक्टरांनी लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर वाढत्या उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आनंदाची बातमी : पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये देणार : कृषिमंत्री
बदललेली जीवनशैली, घरांची रचना, आधुनिक बांधकाम, वृक्षतोडीमुळे उष्णतेचा प्रकोप कायम राहणार असल्याने यावर दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाकडूनही काही उपाययोजना करण्यात येत आहेत. शरिराचे तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढले तर ते सुर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येते. त्यामुळे राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात दरवर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो.
कडक उन्हाच्या बचावासाठी पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा. हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी खाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. तर उन्हाच्या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करू नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका. असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्यूज : तुर्की बाजरीची सध्या जोरदार चर्चा !
1) तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे.
2) हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
3) बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलाचा वापर करावा.
4) प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
5) उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकवी.
6) शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस (ORS), घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा.
7) अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
8) गुरांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
9) घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
डख अंदाज : या तारखेला होणार मान्सूनचे आगमन !
10) पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावी.
11) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
12) सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे.
13) पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.
14) बाहेर कामकाज करीत असताना अधूनमधून विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
15) गरोदर, कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी.
16) रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
17) जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.
18) लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
19) दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
20) गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
21) बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत.
22) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.
उन्हाचा त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. .
ब्रिमेटो : एकाच झाडाला येणार टोमॅटो आणि वांगी
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1
आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा
👇 👇 👇