छत्रपती संभाजीनगरमधील इसारवाडी (ता. पैठण) येथे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या ‘सिट्रस इस्टेट’ उभारण्यात येत असून, या प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्रेकिंग : अंदाज चुकवत मान्सून अंदमानात
40 कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून मोसंबीची दर्जेदार आणि जातिवंत रोप तयार करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आणखी 12 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एक जागतिक दर्जाचे ‘सिट्रस इस्टेट’ म्हणून हा प्रकल्प नावारुपास येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील आणि पर्यांयाने राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्याची शक्यता आहे.
यावेळी ‘सिट्रस इस्टेट’ च्या विविध विकासकामांचे भुमिपूजन पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते व कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
पार चढला : राज्यात उष्माघाताचे 12 बळी
या प्रसंगी बोलताना पालकमंत्री संदिपान भूमरे म्हणाले, सिट्रस इस्टेट उभारणीचा अभ्यास करण्यासाठी पंजाब येथील सिट्रस पार्कचा बारकाईने अभ्यास केला आहे. इसारवाडीतील या सिट्रस इस्टेटमधून शेतकऱ्यांना मोसंबीचे दर्जेदार रोप तयार करुन देण्यात येईल. तसेच येथे मोसंबी या फळपिकावर संशोधन देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये प्रशिक्षण घेऊन मोसंबी लागवडीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात 40 हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड केली जात असल्याचे सांगून, भुमरे म्हणाले या दोन्ही जिल्ह्यात मिळून हेक्टरी 8 टन एवढे मोसंबीचे उत्पादन घेतल्या जाते पण हे उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना कृषी आयुक्त सुनिल चव्हाण म्हणाले की, या सिट्रस इस्टेटच्या उभारणीसाठी पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे 40 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यात मोसंबीचे 65 हजार हेक्टर क्षेत्र आहे. मोसंबीला आता राजाश्रय मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा मोसंबी लागवडीकडे वळले पाहिजे. ‘सिट्रस इस्टेट’ मध्ये चांगले रोप बनविण्यात येतील. तसेच प्रशिक्षण देण्यात येत असल्याने सर्वांनी प्रशिक्षण घ्यावे. पेप्सी, कोको कोला अशा शीतपेयांमध्ये मोसंबीचा रस टाकता येईल का ? याचा देखील राज्य सरकार विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शरद मँगो : शरद पवारांच्या नावाने आंबा !
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1