राज्य सरकारचा महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा 12 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर वैध ठरला. अखेर बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या शौकीनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकाळा झाला असला तरी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत नवीन मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक काढले आहे. 16 पानांच्या या परिपत्रकात जवळपास 100 पेक्षा जास्त अटी आणि सूचना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : गोकुळच्या चेअरमनपदी अरुण डोंगळे यांची वर्णी
बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर प्राणी मित्रांनी काही गोष्टींवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली तयारी केली. नव्या नियमावलीनूसार गावचे संस्कृती परंपरेनुसारचे धार्मिक सण उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात आलेली आहे.
आता राज्यात ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाईल. त्या त्या भागातील जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, राजकीय पुढारी किंवा नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शर्यती घेता येणार नाहीत असे परिपत्रकात म्हटले आहे. या निर्णयाचे बैलगाडा मालकांनी स्वागतच केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2017 आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम आणि अटी / शर्तीचे काटेकोरपणे पालन करुन बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात यावे, असे आदेश या पत्रकातून दिले आहे.
बैलगाडा शर्यतीचे असे आहेत नवे नियम
1.नमूद कायदा व नियम यामधील तरतूदींनुसार महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी देण्यात यावी..
2. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस इ. प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी कोणत्याही परिस्थितीमध्ये देण्यात येवू नये.
3. नमूद कायदा व नियम यामधील तरतूदींनुसार राज्यात केवळ बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी अशा प्रकारच्या 1000 मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्या बैलगाडी शर्यतीस परवानगी आहे. राज्यात अनधिकृतपणे आयोजित होणाऱ्या आरत पारत, बैल-घोडा, लाकूड ओंडका ओढणे, चिखलगुट्टा, समुद्रकिनाऱ्यावरील शर्यती, टक्कर तसेच 1000 मीटर पेक्षा जास्त अंतराच्या इतर तत्सम बैलगाडी शर्यती प्रतिबंधीत असतील.
ब्रेकिंग न्यूज : लातूर जिल्ह्यात जनावरांना पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव
4. नमूद कायदा व नियम यामधील तरतुदींनुसार बैलगाडी शर्यती आयोजित करू इच्छिणाऱ्या आयोजकांनी किमान 15 दिवस अगोदर यासोबत जोडलेल्या अनुसूची “अ” मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विहित नमुन्यामध्ये आयोजकाच्या ओळखींचा व पत्त्याच्या पुराव्यासह व बँक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात रु. 50,000/- इतक्या प्रतिभूती ठेवीसह संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा.
5. अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जाची तपासणी करुन जेथे बैलगाडी शर्यत आयोजीत होणार आहे त्या ठिकाणी शर्यत आयोजित होण्यासारखी परिस्थिती आहे अथवा नाही याची तपासणी करण्यात यावी. यासाठी एका अथवा त्यापेक्षा अधिक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. सदर अधिकारी प्रस्तावित बैलगाडी शर्यत आयोजन ठिकाणी भेट देवून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना 6 दिवसाच्या आत सोबत जोडलेल्या अनुसूची “इ” नुसार सादर करतील.
6. अर्ज प्राप्त झाल्यापासून ते परवानगी देणे अथवा नाकारणे याबाबतची कार्यवाही कामकाजाच्या 7 दिवसाच्या आत पुर्ण करतील.
आनंदाची बातमी : 14 ऑगस्टला लातूरमध्ये सोयाबीन परिषद : कृषीमंत्री सत्तार
7. बैलगाडी शर्यतीच्या आयोजना दरम्यान अधिनियमांचे, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास संबंधीत शर्यत अथवा संपुर्ण शर्यतीचे आयोजन थांबविण्यास सदर “निरीक्षक” प्राधिकृत असतील.
8. सदर “निरीक्षक” शर्यतीसंबंधीचा अहवाल शर्यत आयोजन संपल्यानंतर 72 तासाच्या आत सोबत जोडलेल्या अनुसूची “ई” नुसार जिल्हाधिकारी यांना सादर करतील.
9. अन्य कोणतेही वाहन धावपट्टीवर किंवा धावपट्टी बाहेर बैलगाडी भोवती चालविता येणार नाही.
10. कोणताही गाडीवान किंवा बैलांच्या शर्यतीचा प्रस्ताव देणारी व्यक्ती, तिच्याकडे किंवा गाडीवर कोणतीही काठी, चाबुक, पिंजरी किंवा बैलास दुखापत करू शकेल किंवा बैलास विजेचा धक्का देऊ शकेल असे कोणतेही साधन किंवा उपकरण बाळगणार नाही.
11. बैलाचे पाय बांधणे किंवा बैलास काठीने मारणे अथवा पायाने मारणे अथवा चाबूक अथवा पिंजरी यासारखे कोणतेही साधन अथवा विद्युत धक्का किंवा अन्य साधनाचा वापरणे अथवा जननअंग पिळणे अथवा जननअंगावर लाथ मारणे अथवा आरुने जननअंगास इजा पोहोचवणे अथवा शेपूट पिरगळणे अथवा शेपटीचा चावा घेणे यास गाडीवानास प्रतिबंध असेल.
12. बैलगाडी शर्यतीकरिता वळू अथवा बैलांना इतर कोणत्याही प्रकारच्या इतर प्राण्यासोबत (उदा. घोडा) जुंपण्यात येणार नाही.
ब्रेकिंग : 8 जूनला राज्यात मान्सूनची दमदार हजेरी : पंजाबराव डख
https://www.facebook.com/shetimitramagazine03
https://www.instagram.com/shetimitra03/
https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1