नक्की मान्सून महाराष्ट्रात कधी ?

0
1092

सध्या सर्वांना प्रतिक्षा आहे ती मान्सूनच्या पावसाची ! यंदा पाऊस कसा आणि किती पडणार याचे अंदाज सर्वत्र बांधले जात आहे. शेतकर्‍यांचे वर्षेभराचे आर्थिक गणीत या पावसावर अवलंबून आहे. पावसाअभावी सार्‍या बाजारपेठा येवढ्या उकाड्यातही थंड पडल्या आहेत. आता मान्सून 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज पुढे आला आहे.

हे नक्की वाचा : या योजनेत सहभागी व्हा ; मिळवा एकरी 50 हजार

भरतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे पासून अडकलेल्या नैऋत्य मान्सूनने 29 मे रोजी वेग पकडला आहे. मान्सूनने 22 ते 26 मे या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवे होते. परंतु तो 31 मे रोजी त्या स्थितीत पोहोचला. त्यामुळे नेहमीपेक्षा एक आठवडा उशिराने मान्सून अस्तित्व दाखवत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची कामे पूर्ण करण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे.

मान्सूनचा वेग पाहता ईशान्य मोसमी पाऊस केरळ आणि तामिळनाडूमध्ये 5 जूनपर्यंत सुरू होईल, असा अंदाज आहे. यामुळे 15 जूनपासून देशातील बहुतांश भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मान्सून अपडेट्स : जूनमध्ये मान्सून पाठ फिरवणार  

महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये 10 जूनपर्यंत मान्सून पोहोचेल. 15 जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. तर 20 जूनपासून राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पाऊस पडेल. मान्सूनचा हा टप्पा 8 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाऊस लवकरच सुरू होईल. अशी अपेक्षा आहे.

धक्कादायक : पाच वर्षात तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढणार ?

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1

आपणास ही बातमी आवडली असल्यास खालील स्टार क्लिक करून रेटींग करा

👇 👇 👇

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here