यंदा मान्सूनचे आगमन केरळकडून नव्हे तर पूर्वेकडून म्हणजेच तेलंगानाकडून होणार असल्याचा दावा परभणी येथील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे. डख यांनी मान्सून संदर्भात एक महत्त्वाची माहिती नुकतीच सार्वजनिक केली आहे.
शुभवार्ता : मान्सून केरळात दाखल
डख यांच्या मते, यंदा देखील 2019 सारखीच परिस्थिती राहणार असून, महाराष्ट्रात समाधानकारक मान्सून राहणार आहे. ते सांगतात की, जर मान्सूनचे पूर्वेकडून आगमन झाले तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत असतो.

यंदा देखील पूर्वेकडून मान्सूनचे आगमन होणार असल्याने, यावर्षी विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी व बीड या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे. तसेच यंदा जून महिन्यात याआधी कधीही पडलेला नसेल असा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
मान्सून अपडेट्स : चिंता वाढली : मान्सून अजून लांबणीवर
दरम्यान, आज भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळात दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. येत्या दोन दिवसात मान्सून कर्नाटकात येईल व 16 जूनला कोकणात मान्सून दाखल होईल असाही अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र पंजाबराव डख यांनी या अंदाजाच्या अगदी उलट अंदाज वर्तवला आहे.
डख यांनी वर्तवलेल्या सुधारित मान्सून अंदाजानुसार, यंदा मान्सूनचे राज्यात आठ जूनला अर्थातच आज आगमन होणार आहे. तसेच राज्यात मान्सूनचा जोर 10 ते 12 जून दरम्यान वाढणार असाही त्यांचा अंदाज आहे. सोबतच विदर्भात मान्सूनचे आगमन 11 ते 12 जून या काळात होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून 14 जून ते 20 जून पर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि शेतकरी बांधवांच्या 28 जूनपर्यंत पेरण्या आटोपल्या जातील असे भाकीत त्यांनी या सुधारित अंदाजामध्ये व्यक्त केल आहे. एकंदरीत आता भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो की पंजाबराव डख यांचा अंदाज ? हेच विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
मोठी बातमी : मान्सूनपूर्व पावसाची 11 जिल्ह्यात दांडी : खरीप हंगाम लांबण्याची शक्यता

https://www.facebook.com/shetimitramagazine03

https://www.instagram.com/shetimitra03/

https://t.me/joinchat/H_FpAfzDc2UzYzQ1













Users Today : 10
Users Last 30 days : 848
Users This Month : 610
Users This Year : 1322
Total Users : 236771