केंद्र सरकारने खरीप 2023-24 या हंगामातील किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या असून, यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाची पिके असलेल्या सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांच्या अधारभूत किमतीमध्ये वाढ झाली आहे.
आनंदाची बातमी : यंदा 25 हजार शेतकऱ्यांना अनुदानातून मिळणार ट्रॅक्टर
केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किमतीच्या वाढीची शिफारस सरकारला सादर केल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत आधारभूत किंमतींवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्रात खरीपातील मुख्य पीक बनलेल्या सोयाबीनचा हमीभाव 300 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 4 हजार 600 रुपये करण्यात आला. तर तुरीच्या हमीभावात 400 रूपयांची वाढ करून तो 7000 रूपये करण्यात आला.
केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (हमीभाव) 640 रुपयांची वाढ केली. तिळाच्या हमीभावात सर्वाधिक 805 रुपयांची तर मुगाच्या हमीभावात 803 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
ब्रेकिंग : यंदा मान्सून केरळकडून येणार नाही : पंजाबराव डख
पिकांच्या उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा देऊन हमीभाव निश्चित करण्यात आले, असा दावा केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. बाजरीला उत्पादनखर्चापेक्षा सर्वाधिक 82 टक्के अधिक हमीभाव देण्यात आला; तर तुरीसाठी उत्पादन खर्चावर 58 टक्के नफ्यासह हमीभाव जाहीर केला, असेही गोयल यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत. हंगामातील निचांकी भावपातळीवर दोन्ही शेतीमालांचे व्यवहार होत आहेत. खरिपातील हमीभाव जाहीर झाल्यानंतर बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करत होते.
या पार्श्वभूमीवर सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात बऱ्यापैकी वाढ केली आहे. मध्यम लांबीच्या धाग्यासाठी 540 रुपयांची वाढ केली. तर लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव 640 रुपयांनी वाढवला आहे. मध्यम धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल 6 हजार 620 रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला 7 हजार 20 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.
शुभवार्ता : मान्सून केरळात दाखल
उडदाच्या हमीभावात 350 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता उडीद 6 हजार 950 रुपये झाला आहे. भुईमुगाचा हमीभाव 527 रुपयांनी वाढवून 6 हजार 377 रुपये करण्यात आला.
केंद्राने चालू हंगामात मक्याच्या हमीभावात सर्वात कमी वाढ केली. गेल्या हंगामात मक्याला 1 हजार 962 रुपये हमीभाव होता. त्यात आता 128 रुपयांची वाढ करण्यात आली. यंदाच्या हंगामात 2 हजार 90 रुपये हमीभाव करण्यात आला आहे. तर भातामध्ये 143 रुपयांची वाढ करण्यात आली. यंदा सामान्य ग्रेडच्या भाताला 2 हजार 183 रुपये आणि ए ग्रेडच्या भाताला 2 हजार 203 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे.
मान्सून अपडेट्स : चिंता वाढली : मान्सून अजून लांबणीवर
https://www.facebook.com/shetimitramagazine03